‘महाराष्ट्र केसरी’ साठी जालना जिल्ह्याचा संघ सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:29 AM2018-12-17T00:29:28+5:302018-12-17T00:29:51+5:30
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद तसेच जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाकडून शहरातील आझाद मैदान येथे १९ ते २३ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ६२ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा राष्ट्रीय तालीम संघातर्फे निवड चाचणी स्पर्धा घेऊन जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद तसेच जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाकडून शहरातील आझाद मैदान येथे १९ ते २३ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ६२ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा राष्ट्रीय तालीम संघातर्फे निवड चाचणी स्पर्धा घेऊन जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला.
सदरील निवड चाचणी स्पर्धा शहरातील गुरु रामचरण उस्ताद भक्त कुस्ती आखाड्यात घेण्यात आली. या निवड चाचणी स्पर्धेसाठी जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल ३५० मल्लांनी सहभाग नोंदविला. विविध वजन गटात ही स्पर्धा खेळीमेळीच्या व चुरशीच्या लढतीमध्ये पार पडली.
तत्पूर्वी जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष किशनलाल उस्ताद भगत यांच्या हस्ते हनुमंताची पूजा व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे संस्थापक अध्यक्ष स्व. चरण पहेलवान भक्त यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व आखाडा पूजन करून स्पर्धेला प्रारंभ झाला.
यावेळी सरचिटणीस प्राचार्य डॉ दयानंद भक्त, उपाध्यक्ष लक्ष्मण सुपारकर, प्रा डॉ आत्मानंद भक्त, गोपाल काबलीये, प्रा डॉ भिक्कूलाल सले, प्रा मंगेश डोंगरे (एन आय एस कुस्ती प्रशिक्षक), प्रा डॉ शाम काबुलीवाले, प्रा डॉ नितीन भक्त, आखाडा कुस्ती प्रशिक्षक भोलानाथ पाल (एन आय एस कुस्ती प्रशिक्षक) आदी पदाधिकारी तसेच दोन ते अडीच हजार कुस्तीशौकिनांची उपस्थिती होती. या निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत खालील विजयी मल्ल राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत.एकूणच जालन्यात होऊ घातलेल्या कुस्ती स्पर्धेची तयारी जोरात सुरू असून, आझाद मैदानावर स्टेडीयम उभारणीचे काम सुरू आहे.
जालना : ६२ वी कुस्ती स्पर्धा
फ्री-स्टाईल गादी गट
५७ किलो - प्रथम - शमुवेल थॉमसन जाधव, द्वितीय- सुनील प्रभाकर मोठे, ६१ किलो - प्रथम - अक्षय राजेश धानुरे, द्वितीय - नवल गोविंद झुंगे, ६५ किलो - प्रथम - भूषण कचरू काळे, द्वितीय - इम्रान बाबूशाह, ७० किलो - प्रथम - सयाजी श्रीमंत बाळराज, द्वितीय - भारत कचरू काळे, ७४ किलो - प्रथम - करणसिंग सुरजसिंग ठाकूर. द्वितीय - परमेश्वर साहेबराव खांडके, ७९ किलो - प्रथम - बाळासाहेब अशोक चव्हाण , द्वितीय - रामसिंग चैनसिंग चरावंडे, ८६ किलो - प्रथम - उत्तम बाळासाहेब वीर , द्वितीय - अमोल शिवाजी राऊत, ९२ किलो - प्रथम - ज्ञानेश्वर नामदेव जाधव, द्वितीय - अंकुश राजपूत, ९७ किलो - प्रथम - नारायण नामदेव जाधव
महाराष्ट्र केसरी गट
(८६ ते १२५ कि.) - प्रथम - परख दयानंद भक्त
फ्री-स्टाईल माती गट
५७ किलो - प्रथम - सागर गणेशलाल बटावाले , द्वितीय- आनंद बाबूलाल जाधव, ६१ किलो - प्रथम - स्वप्नील प्रभाकर मोठे, द्वितीय - अतुल भारत क्षीरसागर, ६५ किलो - प्रथम - यश मुकुंद लहाने, द्वितीय - शिवाजी रमेश तौर, ७० किलो - प्रथम - सुरेश ज्ञानेश्वर यज्ञेकर , द्वितीय - संभाजी तुकाराम डोईफोडे, ७४ किलो - प्रथम - अमोल राजेश धानुरे . द्वितीय - राम भगीरथ मोरे, ७९ किलो - प्रथम - सय्यद मोईन सय्यद अफसर , द्वितीय - भाऊसाहेब नामदेव कावळे, ८६ किलो - प्रथम - बालाजी गणेश एलगुंदे , द्वितीय - दारासिंग अजबसिंग डोभाळ, ९२ किलो - प्रथम - जगदीश प्रल्हाद चरावंडे , द्वितीय - ज्ञानेश्वर नामदेव जाधव, ९७ किलो - प्रथम - गोपी चमनबहादूर राजपूत , द्वितीय - संदीप शेषनारायण कोल्हे, महाराष्ट्र केसरी गट (८६ ते १२५ कि.) - प्रथम - विलास सुभाष डोईफोडे