सौरपंप जोडणीत जालना जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:41 AM2019-07-29T00:41:42+5:302019-07-29T00:42:27+5:30

शेतकऱ्यांना सौरपंपाद्वारे दिवसाही शाश्वत आणि दर्जेदार वीजपुरवठा देण्याच्या मुख्यमंत्री सौरपंप कृषिपंप योजनेत सौरपंपाच्या जोडणीत जालना जिल्हा मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर आहे.

Jalna district tops in solar pump connection | सौरपंप जोडणीत जालना जिल्हा अव्वल

सौरपंप जोडणीत जालना जिल्हा अव्वल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शेतकऱ्यांना सौरपंपाद्वारे दिवसाही शाश्वत आणि दर्जेदार वीजपुरवठा देण्याच्या मुख्यमंत्री सौरपंप कृषिपंप योजनेत सौरपंपाच्या जोडणीत जालना जिल्हा मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर आहे. आतापर्यंत १०७ सौरपंपांची जोडणी करण्यात आली आहे.
प्रत्येक राज्याच्या विकासात कृषी क्षेत्राचे महत्वपूर्ण योगदान असते. आणि त्यासाठी कृषीपंपाना शाश्वत वीजपुरवठा मिळणेही गरजेचे आहे. ही बाब हेरुन राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळावा तसेच वीजबिलापासून शेतक-यांची सुटका व्हावी यासाठी राज्यशासनाने मुख्यमंत्री सौरकृषीपंप योजना सुरु केली आहे. या योजनेला मराठवाड्यातील शेतक-यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
यात अर्ज करण्यापासून ते सौरपंप जोडणीतही जालना जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे. जालना जिल्ह्यातील २७ हजार ७५६ शेतक-यांनी आतापर्यंत आॅनलाईन अर्ज केले आहेत. यामध्ये अनूसुचित जाती प्रवर्गातून १६६२ एसटी प्रवर्गातून १६७, खुल्यामधून ८ हजार ६०० शेतक-यांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी १० हजार ७४७ शेतक-यांना कोटेशन वाटप केले आहे. तर ५ हजार २८० शेतक-यांनी सौरपंपासाठी पैसे भरले आहेत. अर्जाची छाननी करुन आतापर्यंत १०७ शेतक-यांना कृषीसौरपंपाची जोडणी देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून जालना जिल्ह्याने सौरपंप जोडणीत अव्वल आहे. एक वर्षाच्या कालावधीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात प्रभावीपणे राबविली जाईल.
एजन्सीकडून जोडणीस होतोय विलंब
या योजनेत अर्ज केलेल्या शेतक-यांना सौरपंप पॅनल, विद्युत मोटरीसह इतर साहित्य खरेदीसाठी महावितरणे राज्यभर एजन्सी नेमल्या आहेत. त्यांच्याकडून शेतक-यांना साहित्याची खरेदी करावी लागते. मात्र अनेक शेतक-यांनी संबंधित एजन्सीकडे पैशाचा भरणा केलेला असतांना साहित्य वाटपात एजन्सीकडून विलंब होत असल्याचे शेतक-यातून ओरड होत आहे. याकडे महावितरणच्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी शेतक-यांतून होत आहे.

Web Title: Jalna district tops in solar pump connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.