जालना जिल्ह्यात सात वसतिगृहांसाठी मिळणार साडेदहा कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:46 AM2018-01-06T00:46:29+5:302018-01-06T00:46:36+5:30
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत मुलींचे वसतिगृह योजनेतून जिल्ह्यात सात ठिकाणी मुलींच्या वसतिगृहांसाठी शासनाने १० कोटी ५० लाखांचा निधी शुक्रवारी मंजूर केला. या निधीतून उभारण्यात येणाºया वसतिगृहात माध्यमिक शिक्षण घेणाºया जिल्ह्यातील सातशे मुलींच्या निवासाची सोय होणार आहे.
बाबासाहेब म्हस्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत मुलींचे वसतिगृह योजनेतून जिल्ह्यात सात ठिकाणी मुलींच्या वसतिगृहांसाठी शासनाने १० कोटी ५० लाखांचा निधी शुक्रवारी मंजूर केला. या निधीतून उभारण्यात येणाºया वसतिगृहात माध्यमिक शिक्षण घेणाºया जिल्ह्यातील सातशे मुलींच्या निवासाची सोय होणार आहे.
केंद्र शासनाच्या अकराव्या पंचवार्षिक योजना कालावधीत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणापासून मुली वंचित राहू नये, यासाठी नववी ते १२ मध्ये शिकणाºया विद्यार्थिनींच्या निवासाकरिता शैक्षणिकदृष्ट्या अप्रगत भागात मुलींचे वसतिगृह बांधण्याची योजना सुरू केली आहे.
यामध्ये १४ ते १८ वयोगटातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेणाºया १०० मुलींसाठी एक या प्रमाणे वसतिगृहांच्या बांधकामास २०११ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानुसार जिल्ह्यातील घनसावंगी, परतूर, मंठा, भोकरदन, अंबड, बदनापूर आणि जालना या सात तालुक्यातील ७०० मुलींच्या माध्यमिक शिक्षण व निवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या नवीन किमतीनुसार वसतिगृह बांधकामासाठी अतिरिक्त साडेदहा कोटींचा निधी आवश्यक होता. त्यास शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी मंजुरी दिली आहे.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत मुलींचे वसतिगृह बांधणे ही केंद्र शासनाची योजना आहे. बांधकामासाठी लागणाºया खर्चात केंद्राचा ६० टक्के तर राज्याचा ४० टक्के हिस्सा आहे.
राज्याच्या हिश्श्यातून मंजूर या निधीतून सातही तालुक्यातील
प्रत्येकी शंभर मुलींच्या राहण्याची सुविधा होईल, अशी सात
वसतिगृहे उभारण्यात येणार
आहेत.