मुंबईतील सी-लिंक ब्रीज बांधण्यात जालन्यातील अभियंत्यांचा सिंहाचा वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:35 AM2021-09-15T04:35:19+5:302021-09-15T04:35:19+5:30

नंतर मुंबईत रस्ते विकास महामंडळात वर्ग एकचे अभियंता म्हणून बदली झाली. त्यावेळी सी-लिंकचे काम सुरू होते. तेथे चीफ इंजिनिअर ...

Jalna engineers play a major role in the construction of C-Link Bridge in Mumbai | मुंबईतील सी-लिंक ब्रीज बांधण्यात जालन्यातील अभियंत्यांचा सिंहाचा वाटा

मुंबईतील सी-लिंक ब्रीज बांधण्यात जालन्यातील अभियंत्यांचा सिंहाचा वाटा

Next

नंतर मुंबईत रस्ते विकास महामंडळात वर्ग एकचे अभियंता म्हणून बदली झाली. त्यावेळी सी-लिंकचे काम सुरू होते. तेथे चीफ इंजिनिअर म्हणून शरद सबनीस हे होते, तर सचिव म्हणून जे.टी. सबनीस म्हणून होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली समुद्रातील या पहिल्या पुलाचे काम कंत्राटदार कंपनी तसेच कन्सलटंट यांच्यात ताळमेळ घालून करून घ्यावे लागत असे. समुद्रातील खडकांमध्ये ड्रील मशीनने खड्डे करून हा पिलर बांधावा लागला. ज्याची उंची ही १२४ मीटर उंच आहे. हा प्रकल्प त्यावेळी सहाशे कोटींचा होता. हा पूल पुढे मलबार हिल आणि बोरेवलीला जोडणे प्रस्तावित होते. ते काम आजही मागे पडले आहे.

दबावाला बळी पडू नये

सार्वजनिक बांधकाम क्षेत्रात काम करताना आपण सुप्रिटेंडेड इंजिनिअरपर्यंत पाेहोचलो. या नोकरीनिमित्त जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात जाण्याचा योग आला. अनेक चांगले प्रकल्प मार्गी लावले. ही कामे करताना त्यांचा दर्जा महत्त्वाचा असतो, त्या दर्जाकडे हल्ली पाहिजे तेवढे लक्ष दिले जात नसल्याचे वास्तव आहे. तरुण अभियंत्यांनी कुठेही काम करताना राजकीय मंडळीशी संबंध ठेवून त्यांना हे कसे चांगले होऊ शकते हे पटवून देता आले पाहिजे. कामाच्या दर्जाबाबतचा दबाव हा येत असतो, परंतु त्याला बळी न पडता हे काम आपण आपल्या देशातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी करत असल्याचे लक्षात ठेवूनच करावे.

विवेक घाणेकर, सेवानिवृत्त स्थापत्य अभियंता, जालना.

Web Title: Jalna engineers play a major role in the construction of C-Link Bridge in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.