Jalna Lok Sabha Result 2024 केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पिछाडीवर; कॉँग्रेसचे कल्याण काळे पुढे
By विजय मुंडे | Published: June 4, 2024 12:06 PM2024-06-04T12:06:19+5:302024-06-04T12:08:39+5:30
Jalna Lok Sabha Result 2024: तिसऱ्या फेरीत कॉँग्रेसचे कल्याण काळे यांची आघाडी ४ हजार ९६८ मतांवर गेली आहे.
Jalna Lok Sabha Result 2024 : जालना लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीतील मतमोजणीच्या पहिल्या फेरीत महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) हे २४२७ मतांनी आघाडीवर होते. तर दुसऱ्या फेरीत मविआचे कल्याण काळे (Kalyan Kale) १८३ मतांनी आघाडीवर आले आहेत. तिसऱ्या फेरीत ही आघाडी ४९६८ मतांवर गेली आहे.
जालना लोकसभेची निवडणूक चुरशीची झाली असून, आज सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. मतमोजणी संथ गतीने सुरू आहे. तिसऱ्या फेरी अखेर महायुती उमेदवार रावसाहेब दानवे यांना ५२ हजार ७७६, मविआचे उमेदवार
कल्याण काळे यांना ५७ हजार ७४४, अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांना १९ हजार ९९६ तर वंचितचे उमेदवार प्रभाकर बकले यांना ६१३९ मते मिळाली आहेत.