जालना पालिका : गहाळ फायली दप्तर दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:34 AM2018-08-12T00:34:53+5:302018-08-12T00:36:42+5:30

जालना पालिकेतील विविध विकास कामांच्या फायली या पािलकेच्या त्या विभागात न ठेवता, अनेक फायली या नगरसेवक तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या घरी नेण्याचे प्रकार वाढले होते. मध्यंतरी या संदर्भात प्रभाग क्रमांक २३ च्या नगरसेविका संध्या देठे यांनी तक्रार दाखल केली होती.

Jalna: missing files found | जालना पालिका : गहाळ फायली दप्तर दाखल

जालना पालिका : गहाळ फायली दप्तर दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना पालिकेतील विविध विकास कामांच्या फायली या पािलकेच्या त्या विभागात न ठेवता, अनेक फायली या नगरसेवक तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या घरी नेण्याचे प्रकार वाढले होते. मध्यंतरी या संदर्भात प्रभाग क्रमांक २३ च्या नगरसेविका संध्या देठे यांनी तक्रार दाखल केली होती.
त्याची तातडीने दखल घेत मुख्याधिका-यांनी पालिकेतील सर्व विभागांनी त्यांच्या मूळ फाईली या पालिका कार्यालयात जमा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता जवळपास गहाळ झालेल्या फाईली पुन्हा पालिकेत जमा करण्यात आल्याचे पत्र मुख्याधिका-यांनी संध्या देठे यांना दिले आहे.
त्यामुळे संध्या देठे यांनी स्वातंत्र्य दिनी जो उपोषण करण्याचा इशारा दिला होता, तो आता मागे घेण्यात आल्याचे संध्या देठे यांनी एका निवेदनाव्दारे कळविले आहे.
विशेष करून बांधकाम विभागातून फाईली घरी नेण्याचे प्रकार वाढले होते.

Web Title: Jalna: missing files found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.