जालना पालिकेची सभा वादळी ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:57 AM2017-12-22T00:57:31+5:302017-12-22T01:00:01+5:30

जालना नगर परिषदेची शुक्रवारी होणारी सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची चिन्हे असून, भूखंडांचा विषय गाजण्याची शक्यता पालिका वर्तुळातून व्यक्त होत आहे.

Jalna municipal meeting will be stormy | जालना पालिकेची सभा वादळी ठरणार

जालना पालिकेची सभा वादळी ठरणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना नगर परिषदेची शुक्रवारी होणारी सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची चिन्हे असून, भूखंडांचा विषय गाजण्याची शक्यता पालिका वर्तुळातून व्यक्त होत आहे. तसेच कॉँग्रेस नगरसेवकांकडून पालिका प्रशासनाला भूखंड अतिक्रमणमुक्त करून उत्पन्न वाढीची मागणी केली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
लोकमतने वृत्तमालिकेच्या माध्यमातून शहरातील पालिकेच्या मालकीच्या असलेल्या भूखंडांबाबतचे वास्तव समोर आणले. याची दखल घेत माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी गुरुवारी कॉँग्रेसच्या २८ नगरसेवकांची बैठक घेत याप्रश्नी आक्रमक भूमिका घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी भूखंडांवर बांधण्यात आलेल्या बीओटी तत्त्वावरीलइमारतींचा आढावा घेण्याची मागणीही कॉँग्रेसतर्फे केली जाणार आहे. राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते तथा उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी पालिकेच्या भूखंडांबाबतची भूमिका सुरुवातीपासूनच उचलून धरली असून, यासंदर्भातील पत्रही दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुख्याधिका-यांना दिले आहे.
याची माहिती मिळाल्यानंतर राष्टÑवादीतर्फे पालिकेच्या हितार्थ भूमिका घेऊन उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे उपनगराध्यक्ष राऊत म्हणाले.
एकूणच सत्ताधा-यांनीच प्रशासनाविरोधात शड्डू ठोकल्याने विरोधकांची सभागृहात काय अवस्था होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Jalna municipal meeting will be stormy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.