जालना पालिका @ १०२ ..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 01:01 AM2019-03-07T01:01:55+5:302019-03-07T01:02:27+5:30

केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर योजने अंतर्गत बुधवारी जाहीर झालेल्या निकालामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ४१ अंकांनी झेप घेतली असून, गेल्यावर्षी जालना पािलकेचा क्रमांक १४२ वर होता, तो आता १०२ वर आला आहे.

Jalna Municipality @ 102 ..! | जालना पालिका @ १०२ ..!

जालना पालिका @ १०२ ..!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर योजने अंतर्गत बुधवारी जाहीर झालेल्या निकालामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ४१ अंकांनी झेप घेतली असून, गेल्यावर्षी जालना पािलकेचा क्रमांक १४२ वर होता, तो आता १०२ वर आला आहे. आम्हाला पहिल्या शंभरमध्ये येण्यासाठीचे प्रयत्न होते, मात्र ते शक्य झाले नाही. असे असले तरी आमची ही प्रगती देखील आम्हांला नवीन ऊर्जा देणारी असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी व्यक्त केली.
जालना शहर स्वच्छतेसाठी आज घडीला ५२ घंटागाड्या असून, पालिकेचे ३०० तर खाजगी तत्त्वावर २०० मजुरांना सोबत घेऊन शहरातील सर्व रस्ते दररोज साफ केले जातात. यासाठी १८ ट्रॅक्टर असून, वैयक्तिक शौचालये बांधण्यावरही भर दिला जात आहे. जालन्यातील घनकचरा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने आमचे ४०० गुण कमी झाल्याची खंत नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी व्यक्त केली. दरम्यान, सामनगाव येथील घनकचरा प्रकल्प आता नव्याने पूर्ण करण्यासाठी साडेचार कोटी रूपयांचे टेंडर काढले असून, हे काम येत्या सहा महिन्यांत मार्गी लागणार आहे.
शहरातील कचरा उलचलून सारवाडी मार्गवरील डंपिंग ग्राऊंडवर टाकला जातो, तो यापुढे तेथे न टाकता ते ग्राऊंड पूर्ण स्वच्छ करून तेथे बाग उभारण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न राहणार आहेत.
आता जालनेकरांना स्वच्छतेसाठी दररोज सर्व प्रभागांत जिंगल बेल असलेली घंटागाडी दोनवेळेस फिरवली जात आहे, त्यामुळे शहरातील रस्ते, चौकातील कचऱ्याचे प्रमाण कमी झाले आहे.
आता या घंटागाडीला महिलांच्या सुविधेसाठी सॅनेटरी नॅपकिन तसेच लहान मुलांचे डायपर टाकण्यासाठी स्वतंत्र लालडबा बसवण्यात येणार आहे. सॅनेटरी नॅपकिनची विल्हेवाट लावताना महिलांची मोठी मुस्कटदाबी होते, ती यापुढे होणार नाही.
जालना : राज्य अमृतमध्ये ३० व्या स्थानी
४केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर अर्थात अमृत योजनेत देशातील एक लाख लोकसंख्या असलेल्या ४२५ नगर पालिकांनी सहभाग घेतला होता. त्यात जालना नगर पालिका ही १०२ व्या स्थानावर आहे. तर राज्य सरकारच्या अमृत योजने अंतर्गत महाराष्ट्रातील ४५ नगर पालिकांचा सहभाग होता, त्यात जालन्याने ३० वा क्रमांक मिळविला आहे. आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी जशी प्रशसनाची जबाबदारी आहे, तशीच ती जालन्यातील नागरिकांचीही आहे. त्यामुळे सर्वांनी मानसिकता बदलून एकत्रित येऊन शहर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे.
- संगीता गोरंट्याल, नगराध्यक्षा, जालना

Web Title: Jalna Municipality @ 102 ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.