जालना नगरपालिकेने बजावली कंपनीला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 12:32 AM2018-08-05T00:32:43+5:302018-08-05T00:33:42+5:30
जालना नगर पालिकेचा जालना तालुक्यातील सामनगाव येथे घनकचरा प्रकल्प उभारणीचे काम गेल्या नऊ वर्षापासून रखडल्याने, या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मिळणारा ५० लाखाचा निधी अडचणीत सापडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना नगर पालिकेचा जालना तालुक्यातील सामनगाव येथे घनकचरा प्रकल्प उभारणीचे काम गेल्या नऊ वर्षापासून रखडल्याने, या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मिळणारा ५० लाखाचा निधी अडचणीत सापडला आहे.
जालना शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत निर्मितीसह कचºयाची शास्त्रशुद्ध पध्दतीने विल्हेवाट लावन्यासाठी चार कोटी रूपयांचा हा प्रकल्प मंजूर करण्यात होता. त्यात प्रारंभीपासून या ना त्या कारणाने वाद होत गेले. हा प्रकल्प पुणे येथील एका कंपनीला पूर्णत्वासाठी देण्यात आला होता. मात्र मध्यंतरी जालना पािलकेकडूनही या कंपनीला हव्या असलेल्या मूलभूत सुविधा देण्यास विलंब झाल्याने देखील या प्रकल्पाचे काम रखडले आहे. एकूणच हा प्रकल्प अपूर्ण राहिल्याने आजही नगर पािलकेला कचºयाची विल्हेवाट लावण्याची डोकेदुखी कायम आहे. शहराजवळ असलेल्या डपिंग ग्राऊंडवर कचºयांचे ढीग जमा झाले आहेत. जालना येथील हा महत्वकांक्षी प्रकल्प असल्याने याला केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुक्रमे ५० लाख रूपये मिळणार होते. परंतु केंद्र सरकारकडून हा निधी खर्चाचे प्रमाणपत्र सादर न केल्याने थांबविण्यात आल्याची चर्चा आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी पुढकार घेण्याची गरज आहे.
प्रकल्प रखडला : पालिकेकडून दंड
पुणे येथील घनकचरा प्रकल्पाचे कंत्राट घेतलेल्या संबंधित कंपनीला वेळेत प्रकल्प पूर्ण न केल्याने जालना पालिकेने प्रथम दंड आकारला होता. मात्र दंड आकारूनही काम न केल्याने कंत्राट रद्द का करण्यात येऊ नये अशा प्रकारची नोटीस बजावल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले.