जालना नगरपालिका शहरात मोकळ्या जागेवर बांधणार व्यापारी संकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 01:21 AM2018-05-14T01:21:27+5:302018-05-14T01:21:27+5:30

जालना पालिकेच्या शहरात अनेक मोक्याच्या ठिकाणी जागा आहेत. त्या जागेवर एक तर अतिक्रमणे झाले आहे, किंवा त्या वापराविना पडून आहेत. यातून उत्पन्नाचा स्त्रोत मिळण्यासाठी आता पालिका या जागेवर व्यापारी संकूल उभारणार आहे.

Jalna Municipality will built shopping complex on open space | जालना नगरपालिका शहरात मोकळ्या जागेवर बांधणार व्यापारी संकुल

जालना नगरपालिका शहरात मोकळ्या जागेवर बांधणार व्यापारी संकुल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना पालिकेच्या शहरात अनेक मोक्याच्या ठिकाणी जागा आहेत. त्या जागेवर एक तर अतिक्रमणे झाले आहे, किंवा त्या वापराविना पडून आहेत. यातून उत्पन्नाचा स्त्रोत मिळण्यासाठी आता पालिका या जागेवर व्यापारी संकूल उभारणार आहे.
जालना पािलकेची सर्वसाधारण सभा ही १७ मे रोजी आहे. या सभेत या मुद्यावर निर्णय होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या सर्वसाधारण पाणी प्रश्नही चांगलाच गाजणार असून, अंतर्गत जलवहिनी अंथरतांना होणाऱ्या तांत्रिक चुकांवरही वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. सभेत मालमत्ता कर वसुलीचा मुद्दाही कळीचा ठरणार आहे.जालना पालिकेची सर्वात महत्वाची आणि मध्यवर्ती भागात असलेली महात्मा फुले मार्केटचा प्रश्न हा गेल्या दहा वर्षापासून तसा रखडला आहे. याबाबत अनेकांनी नवनवीन मार्ग काढले मात्र त्यावर आजपर्यंत एकमत होऊ शकलेले नाही. त्यामुळे महात्मा फुले या व्यापारी संकुलाची नूतन इमारत केवळ कागदावरच आहे.
आता नवीन धोरणा नुसार भोकरदन नाका येथे जुन्या जकात नाक्याची मोठी जागा असून, अग्निशमन दलाच्या जागेवरही मोठे व्यापारी संकुल उभारणे शक्य होणार आहे. आता शासनाने सिडको प्रकल्प उभारणीसाठी खरपुडी परिसरात जागा देऊ केली आहे, त्यासाठी पाणीपुरवठा करण्याच्या मुद्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

Web Title: Jalna Municipality will built shopping complex on open space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.