जालना पंचायत समिती राज्यात मॉर्डल ठरेल : राज्यमंत्री दादाजी भुसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 07:06 PM2018-10-04T19:06:43+5:302018-10-04T19:07:26+5:30
जालना पंचायत समितीची इमारात राज्यातील इतर पंचायत समित्यासाठी मॉडेल ठरु शकते, अशा विश्वास ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
जालना : जालनापंचायत समितीची इमारात राज्यातील इतर पंचायत समित्यासाठी मॉडेल ठरु शकते, अशा विश्वास ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. ग्रामीण विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत जालना पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे गुरुवारी ना. मुसे यांच्या हस्ते भुमीपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी आमदार अरविंद चव्हाण, जि. प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, नगराध्यक्ष संगीता गोर्ंट्याल, जि. प. उपाध्यक्ष सतीष टोपे, माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, जि. प. माजी अध्यक्ष पंडीत भुतेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना राज्यमंत्री भुसे म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासासाठी मी आणि अर्जुन खोतकर नेहमी प्रयत्न करणार आहोत. आज ग्रामविकास मंत्र्याच्या तालुक्यात नसणारी पंचायत समितीची इमारत जालन्यात होत आहे. त्यामुळे याचा नखीच विकासासाठी फायदा होणार आहे. भारतातील प्रत्येक व्यक्तीला हक्काचे घर व्हावे, यासाठी केंद्र सरकारने प्रंधानमंत्री आवास योजना सुरु केली.
सध्या गावा - गावात सर्वे करण्यात येत आहे. परंतु, काही नागरिकांना जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे घराचे स्वप्न अपुर्णच राहात होते. यासाठी काही दिवसापूर्वीच सरकारने एक निर्णय घेतला आहे. यात २०११ अगोदर ज्या नागरिकांनी गायरान जमीनींवर कब्जा केला आहे. त्यांना त्या जमीनी देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, त्यांची नोंदणी करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. एखाद्या ग्रामसेवकांने नोंदणी करण्यासाठी टाळाटाळ केली तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. मालेगावातील अतिक्रमण धारकांना जमींनी मिळाव्या यासाठी मी २००५ पासून पाठपुरावा करत होतो. महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी सरकारने बॅकांना कर्ज तसेच महिलाचे खाते उघडण्यासाठी बॅकांनी एक दिवस देण्याचे आदेशही दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सभापती सुमन घुगे, रघूनाथ तौर, पांडूरंग डोंगरे, दत्ता बनसोडे, ए. जे. बोराडे, पं.स. सदस्य संतोष मोहिते, जनार्दन चौधरी, सुनिल कांबळे, कैलास उभाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, गटविकास अधिकारी मिना रवताळे, कार्यकारी अभियंता के. बी. मराठे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.