खाकी वर्दीच्या मदतीचा ‘जालना पॅटर्न’ होतोय व्यापक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 12:56 AM2019-11-03T00:56:08+5:302019-11-03T00:56:21+5:30

सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून खाकी वर्दीसाठी मदतीचा हात पुढे करणारा जालना पॅटर्न व्यापक होत आहे.

The 'Jalna pattern' of khaki uniform is becoming widespread | खाकी वर्दीच्या मदतीचा ‘जालना पॅटर्न’ होतोय व्यापक

खाकी वर्दीच्या मदतीचा ‘जालना पॅटर्न’ होतोय व्यापक

Next

विजय मुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अचानक एखादे संकट आले तर खाकीतील ‘माणुसकी’ मदतीचा हात पुढे करीत आहे. जालना येथील पोकॉ संजय सोनवणे या अवलियाने गत दीड वर्षापूर्वी सुरू केलेल्या मदत मोहिमेला आता वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही सहकार्य मिळत आहे. त्यामुळे सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून खाकी वर्दीसाठी मदतीचा हात पुढे करणारा जालना पॅटर्न व्यापक होत आहे.
अपघात असो अथवा एखादा गुन्हा असो, मोर्चा असो अथवा राजकीय सभा असो किंवा निवडणुकांचे कामकाज असो पोलीस अधिकारी, कर्मचा-यांच्या खांद्यावर जबाबदारी पडतेच! दैनंदिन कर्तव्याचे तास ठरले असले तरी केव्हा कॉल येईल आणि कर्तव्यावर जावे लागेल याचाही पत्ता नसतो! कायदा- सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी धावणा-या खाकी वर्दीतील एखाद्यावर संकट कोसळले तर त्याला वेळेवर मदतीचा हात मिळतोच असे नाही! मात्र, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, पोलीस उपाधीक्षक अभय देशपांडे आदींच्या सहकार्यातून संकटग्रस्त पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना मदतीचा हात देण्यासाठी पोकॉ संजय सोनवणे यांनी पुढाकार घेतला आहे.
गरजुंना मदतीचा हात पुढे करण्याचा प्रवास सुरू झाला तो राखीव पोलीस उपनिरीक्षक वसंत घायवट यांच्या अपघातानंतर! घायवट यांचा अपघात झाला त्यावेळी कुटुंबातील सदस्य जवळ नव्हते. मात्र, पोलीस दलातील अधिकारी, कर्मचा-यांसह समाज घटकातील इतरांनी उपचाराकामी मोठी मदत केली. ही मदतच सोनवणे यांना प्रेरणा देऊन गेली. इथून सुरू झालेल्या प्रवासात आजवर अनेकांना मदत मिळाली आहे.
दिव्यांगांना अन्नदान
सामाजिक कार्यक्रम असो किंवा एखाद्याचा वाढदिवस असो, हे कार्यक्रम थाटामाटात साजरे न करता दिव्यांग मुलांना अन्नदान करण्याचा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमात पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारीही सहभागी होतात.
युवकांना भरतीचे
प्रशिक्षण
पोलीस अधिकारी, कर्मचा-यांसाठी पोलीस दलाच्या वतीने जीम तयार करण्यात आली आहे. या जीममध्ये पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाºया युवकांना प्रशिक्षण दिले जात आहे. शिवाय ग्राऊंडबाबतही संजय सोनवणे युवकांना मोफत मार्गदर्शन करीत आहेत.

Web Title: The 'Jalna pattern' of khaki uniform is becoming widespread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.