जालना रेल्वेस्थानक, उड्डापुलाला मंजुरी : आता ३५ सीसीटीव्हीची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:57 AM2018-12-13T00:57:28+5:302018-12-13T00:59:07+5:30
रेल्वेस्थानकाला सुरक्षा नसल्याने मागील काही महिन्यापासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वेस्थानकात ३५ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असून, रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाला मजूंरी देण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक विनोद कुमार यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : रेल्वेस्थानकाला सुरक्षा नसल्याने मागील काही महिन्यापासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वेस्थानकात ३५ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असून, रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाला मजूंरी देण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक विनोद कुमार यांनी दिली. बुधवारी ७० अधिकाऱ्यांसह जालना रेल्वेस्थानकाची वार्षिक पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक विनोदकुमार हे सध्या सर्व रेल्वेस्थानकांची वार्षिक पाहणी करत आहे. त्या अनुषंगाने बुधवारी त्यांनी जालना रेल्वेस्थानकाची पाहणी व फिटनेस झोनचे उदघाटन केले. त्यानंतर त्यांनी नागरिक व पत्रकारांशी संवाद साधला. पुढे बोलतांना यादव म्हणाले की, दरवर्षी आम्ही सर्व रेल्वेस्थानकांची पाहणी करतो. येथील सुरक्षा व सोयी सुविधांचा आढावा घेतो. यात प्रवाशांनी सांगितलेल्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न आम्ही कसोशिने करतो असेही विनोदकुमार म्हणाले.
सध्या जालना रेल्वेस्थानकाला पादचारी पुलाची गरज आहे. यासाठी आम्ही पादचारी पुलांना मजूंरी दिली असून, याचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात येणार आहे. तसेच मागील काही दिवसांपासून रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. जालना रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेसाठी ३५ सीसीटीव्ही कॅमेºयांना मजूंरी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रंसगी डीआरएम टी राभा, वरिष्ठ अधिकारी दुर्गाप्रसाद, विक्रमादित्य, के. सुधीरकुमार, वी.बी स्वामी, राजेश शिंदे, स्टेशन अधीक्षक के. ओरान, स्टेशन उपअधीक्षक अमरदीप यांच्यासह आधिकाºयांची उपस्थिती होती.
जालना -खामगाव,मजूंरीच नाही
गेल्या काही वर्षापासून प्रलंबित असलेल्या जालना - खामगाव रेल्वे लाईनला शासनाने अद्यापही मजूंरी दिली नसल्याचे मुख्य व्यवस्थापक कुमार यांनी सांगितले. सध्या आम्ही सर्वेचे काम करत आहे. जशी मजूंरी मिळेल तसे काम सुरु करण्यात येईल.