जालन्याची वाटचाल केरोसिन मुक्तीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:47 AM2018-11-15T00:47:00+5:302018-11-15T00:48:47+5:30
केरोसिनची बचत करून जालना जिल्ह्याने एक प्रकारे केरोसिन मुक्तीकडे वाटचाल सुरू केल्याचे केरोसिनच्या घटलेल्या मागणीवरून दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्ह्यात रेशनकार्डचे संगणीकरणासह बायोमेट्रिक पद्धतीने पॉस मशिनच्या माध्यमातून धान्य वाटप उपक्रमात जालना जिल्हा अव्वलस्थानावर राहिला आहे. तसेच केरोसिनची बचत करून जालना जिल्ह्याने एक प्रकारे केरोसिन मुक्तीकडे वाटचाल सुरू केल्याचे केरोसिनच्या घटलेल्या मागणीवरून दिसून येत आहे.
पुरवठा विभाागाकडून विविध योजना राबविण्यात येत असल्या तरी त्याचा लाभ त्यांना कसा झाला या संदर्भात माहिती देण्यासाठी बुधवारी जिल्हा पुरवठा विभागात नायब तहसीलदार पी.सी. उगले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांन दिलेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात आज घडीला जवळपास ८३ टक्के अन्नधान्याचे वाटप हे पॉस मशिनव्दारेच केले जात आहे. त्यामुळे अन्नधान्य वाटपाच्या बाबतीत पारदर्शकता आली असून, यामुळे शासनाचा मोठा निधी वाचला असल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही वर्षात जालना जिल्ह्याने पॉसमशिन वाटपासह त्याच माध्यमातून रेशनचे धान्यवाटप करण्याच्या योजनेत अव्वल स्थान मिळवले आहे. ते यंदाही कायम असल्याचे उगले म्हणाले. जिल्ह्यात जवळपास साडेतीन लाख रेशनकार्डधारक असून, एकूण १२०० रेशन दुकानातून अन्नधान्याचे वितरण केले जात आहे.