जालन्यात दोन लाखांचा गुटखा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 06:59 PM2018-10-23T18:59:42+5:302018-10-23T19:00:29+5:30
आरोपींकडून १ लाख ९६ हजार रुपयांचा गुटखा व १ लाखांची कार जप्त करण्यात आली आहे.
जालना : नॅनो कारमधून अवैध रित्या गुटखा घेऊन जाणाऱ्या दोन इसमांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने मठ पिंपळगाव पाटी जवळून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख ९६ हजार रुपयांचा गुटखा व १ लाखांची कार जप्त करण्यात आली आहे. संदीप सतीष जैस्वाल (३२, रा. कोर्ट रोड अंबड), अनिल बंडूलाल परदेशी(३६ रा. होळकर नगर अंबड) असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर हे बंदोबस्त करुन जालन्याकडे येत होते. त्यांना खबऱ्यामार्फेत माहिती मिळाली की, जालना अंबड रस्त्यांवरुन नॅनो गाडीतून दोन इसम गुटखा घेऊन जात आहे. ही महिती मिळाल्यानंतर त्यांनी जालन्याकडे येत असतांना वाहनावर नजर ठेवली असता, मठ पिंपळगाव पाटीजवळ एक नॅनो कार (क्र. एमएच.०४. एफए.९०२८)ही अंबडकडे जातांना दिसली.
तेव्हा नॅनो कार चालकाला कार थांबण्याचे सांगितले असता, कार चालकाने कार न थांबता जोरात पळवली. त्यानंतर त्यांनी पाठलाग करुन कारला थांबवून कार चालकाला कारमध्ये काय आहे, अशी विचारण केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. त्यामुळे कारची तपासणी केली असता, कारमध्ये आर. एम. डी. व विमल गुटखा मिळून आला. या कारमधून १ लाख ९६ हजार रुपयांचा गुटखा व १ लाखांची नॅनो असा एकूण २ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर, कर्मचारी रंजित वैराळ, किरण मोरे, चालक संजय राऊत, संदीप गोतीस यांनी केली.