जालना : रेशन दुकानातील साखरेचे दर वधारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:30 AM2018-03-10T00:30:28+5:302018-03-10T00:30:39+5:30
स्वस्त धान्य दुकानांतून शासनाकडून कमी दरात देण्यात येणा-या साखरेचे दर प्रति किलो ७ रुपये वाढविण्यात आले आहेत. विविध योजनांतर्गत देण्यात येणाºया धान्यांवरील दरही वाढविण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : स्वस्त धान्य दुकानांतून शासनाकडून कमी दरात देण्यात येणा-या साखरेचे दर प्रति किलो ७ रुपये वाढविण्यात आले आहेत. विविध योजनांतर्गत देण्यात येणाºया धान्यांवरील दरही वाढविण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
स्वस्तधान्य दुकानांतून अंत्योदय योजनेच्या कार्डधारकांना १ किलो साखर वाटप करण्यात येते. गत पाच-सहा महिन्यांपूर्वी या साखरेचे दर वाढल्याने अंत्योदयच्या लाभार्थ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. पूर्वी २२ रुपये प्रतिकिलो दराने मिळणारी साखर आता २५ रुपये दराने विक्री होत आहे. जिल्ह्यात अंत्योदय योजनेंतर्गत ३ ते ४ लाख लाभार्थी असून, त्यांना या दरवाढीचा फटका बसला आहे. अनेक दुकानांतून निकृष्ट दर्जाचे गहू, तांदूळ वाटप केले जात आहेत. दुकानदार गोडावूनमधून दिलेले धान्यच विकतात की अन्य निकृष्ट धान्य लाभार्थ्यांना याची खात्री केली जात नाही. सरकार यंत्रणेच्या भरोशावर असल्याने दाद मागावी कुणाकडे, असा प्रश्न आहे.
भेदभाव का?
ई-पॉस मशिनच्या नोंदीनुसार रेशन दुकानदारांना धान्याचे नियतन मंजूर केल्या जाते. रेशन दुकानदारांचे ट्रान्झेक्शन कमी असले तरी त्यांना शंभर टक्के तर ग्रामीण भागातील दुकानदारांना ७० ते ९० टक्के धान्य नियमत मंजूर केले जात असल्याची ओरड होत आहे. जिल्हा पुरवठा विभाग याबाबत भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे.