श्रीराम लागूंच्या आठवणींना जालनेकरांनी दिला उजाळा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:46 AM2019-12-19T00:46:10+5:302019-12-19T00:46:45+5:30
प्रसिध्द नाट्य तसेच चित्रपट अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळात सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली.
लोकमत न्य्ाूज नेटवर्क
जालना : प्रसिध्द नाट्य तसेच चित्रपट अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळात सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली. डॉ. श्रीराम लागू हे तीन वेळेस जालना दौऱ्यावर आले होते. त्यांनी जेईएस महाविद्यालच्या स्नेहसंमलनास हजेरी लावण्यासह सामाजिक कृतज्ञता समग्र निधी जमा करण्यासाठी ते जालन्यात आल्याची आठवण चित्रपटप्रेमी आणि शायर अनुराग कपूर यांनी सांगितली.
डॉ. श्रीराम लागू हे जालना येथील जेईएस महाविद्यालयात साधारपणे १९८७ मध्ये वार्षिक स्रेहसंमलनास आले होते. त्याच वेळी त्यांनी लग्नाची बेडी हे नाटक सादर करून जालनेकर रसिकांना खिळवून ठेवले होते, अशी आठवण प्रा. संजय लकडे यांनी सांगितली. तसेच दुसºया एका कार्यक्रमात डॉ. श्रीराम लागू तसेच प्रसिध्द अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, सदाशिव अमरापूरकर, अभिनेत्री तनुजा व अन्य कलाकार हे १९८५ मध्ये सामाजिक कृतज्ञता निधी जमा करण्यासाठी जालना दौºयावर आले होते. त्यावेळी कै.वसंत गोरंट्याल यांनी या सर्व कलावंतांच्या निवासाची व्यवस्था हॉटेल अंबरमध्ये केली होती. त्यावेळी अनुराग कपूर यांच्या नवचेतन युवा ग्रुपने देखील यात आपले योगदान दिल्याचे कपूर म्हणाले. आमच्या नवचेतन ग्रुपमध्ये २५ पेक्षा अधिक युवकांचा समावेश होता.
ज्यावेळी लागू यांची भेट घेऊन आम्ही निधी जमा केला असताना त्याचे त्यांनी तोंड भरून कौतुक केल्याचे आजही आपल्याला चांगले आठवत असल्याचे कपूर म्हणाले. यावेळी त्यांच्या समवेत अनिल चोरडिया, सुनील चोरडिया, राजेश लखोटिया, जयेश पहाडे, आनंद लुणिया, गुरूदत्त यमूल आदींची उपस्थिती होती. दरम्यान अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या एका कार्यक्रमानिमित्त श्रीराम लागू आणि कै. नरेंद्र दाभोळकर हे जालन्यातील जैन इंग्रजी शाळेजवळील महावीर मंगल कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी देवाला रिटायर केलेच पाहिजे या बद्दल सांगितले होते. तसेच मूर्ती पूजा कशी चुकीची असल्याचे उदाहरण देऊन स्पष्ट केले. रस्ता ओलांडताना एका लहान मुलाचा अपघात होतो, आणि तो देखील एका मंदिरासमोर झालेला असतो, जर देव असताच तर या मुलाचे प्राण तो का वाचवू शकला नाही असे सांगून त्यांनी देवांवर विश्वास ठेवणाऱ्यांना आव्हान दिल्याची आठवण त्यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेले कृष्णा नायगव्हाणकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितली.