जनार्दन चव्हाण यांची अध्यक्षपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:31 AM2021-07-28T04:31:17+5:302021-07-28T04:31:17+5:30

बाजारपेठेत गर्दी, सूचनांकडे दुर्लक्ष जाफरबाद : शासनाने डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक केले आहेत. परंतु, शहरातील बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांकडून ...

Janardan Chavan elected as President | जनार्दन चव्हाण यांची अध्यक्षपदी निवड

जनार्दन चव्हाण यांची अध्यक्षपदी निवड

Next

बाजारपेठेत गर्दी, सूचनांकडे दुर्लक्ष

जाफरबाद : शासनाने डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक केले आहेत. परंतु, शहरातील बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांकडून सूचनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेकजण विनामास्क फिरत असून, सुरक्षित अंतराकडे ही दुर्लक्ष केले जात आहे. ही बाब पाहता प्रशासकीय पथकांनी कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

सुरेश गंगोदक यांची अध्यक्षपदी निवड

जालना : मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड संघटनेच्या जालना शहर संघटक अध्यक्षपदी सुरेश गंगोदक यांची निवड करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विजय वाडेकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव दत्तात्रय कपाळे, संदीप वाघमारे आदींची उपस्थिती होती.

दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी

बदनापूर : शहरासह ग्रामीण भागात अवैधरीत्या दारूविक्री करण्यात येत आहे. तळीरामांमुळे भांडण- तंट्यात वाढ होत असून, कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय महिला, मुलींनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब पाहता संबंधितांनी याकडे लक्ष देऊन कारवाईची मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

जनमोर्चाला उपस्थित राहण्याचे आवाहन

जालना : जालना शहरातील पाठक मंगल कार्यालयात गुरुवारी ओबीसी व्ही जे एनटी जनमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप हे मार्गदर्शन करणार आहेत. सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जय भगवान महासंघाचे जिल्हाप्रमुख गजानन ढाकणे यांनी केले आहे. ओबीसीमध्ये मोडणाऱ्या सर्वसमाजांनी आपला स्वार्थ बाजूला ठेवून संघर्ष करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला जास्तीत जास्त बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ढाकणे यांनी केले.

अस्वच्छ पाण्यामुळे आरोग्य धोक्यात

भोकरदन : शहरातील अनेक भागात खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे डासांची पैदास वाढली असून, या भागात साथरोग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिवाय नाल्या तुंबल्याने दुर्गंधीही पसरली असून, याचाही नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. याकडे पालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

मंठा -वाटूर रस्त्यावर जीवघेणे खड्डे

मंठा : निर्मल - मुंबई महामार्गावर मंठा ते वाटूर दरम्यान जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून, यामुळे वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मंठ्यापासून वाटूर पर्यंतचा बारा किलोमीटर रस्ता अक्षरशः अपघाताला आमंत्रण देणारा झाला असून, वाहनधारकांना अत्यंत कसरतीने खड्डे वाचवीत वाहने चालवावी लागत आहेत. खड्डे वाचवण्याच्या नादात अनेकदा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.

कोविड योद्धयांचा सत्कार

जालना : जालना शहरातील डॉ. सुजित वाघ यांनी कोरोना काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आकाश पाटील, बबन घडलिंग, शुभम वाढेकर, राहुल जाधव यांच्यासह नागरिकांची प्रमुख उपस्थिती होती.

रस्त्यांची दुरवस्था

घनसावंगी : शहरांतर्गत विविध भागातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. थोडाही पाऊस झाला की, रस्त्यावर चिखल होत असून, नागरिकांना वाट शोधताना कसरत करावी लागत आहे. याकडे नगर पालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

चालकांची गैरसोय

घनसावंगी : शहराला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. खराब रस्त्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून, प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तरी संबंधितांनी लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

गुटखा विक्री जोमात

जाफराबाद : राज्य शासनाने गुटखा विक्री, वाहतुकीवर बंदी घातली आहे. परंतु, शहरासह ग्रामीण भागात अवैधरीत्या गुटख्याची जोमात विक्री सुरू आहे. शहरातील पानटपऱ्या, हॉटेलसह किराणा दुकानात विक्री होत आहे. संबंधितांनी कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

स्वच्छता मोहीम राबवा

जालना : शहरांतर्गत विविध भागात कचरा साचला आहे. शिवाय नाल्याही तुंबल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संबंधितांनी लक्ष देऊन पावसाळ्यापूर्वी स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Janardan Chavan elected as President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.