१३ हनुमान मंदिरात जन्मोत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 01:04 AM2019-04-20T01:04:36+5:302019-04-20T01:04:57+5:30

हनुमान जयंती उत्सव शुक्रवारी साजरा करण्यात आला.

Jayanti Celebration in Hanuman Temple | १३ हनुमान मंदिरात जन्मोत्सव साजरा

१३ हनुमान मंदिरात जन्मोत्सव साजरा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : हनुमान जयंती उत्सव शुक्रवारी येथे साजरा करण्यात आला. एरवी खेडेगाव म्हटले की शक्यतो हनुमानाचे एकच मंदिर असते. मात्र टेंभुर्णी येथे पुरातन काळापासून हनुमंतांची तब्बल १३ मंदिरे आहेत.
येथील माळी गल्लीतील मुख्य हनुमान मंदिरावर वेदशास्त्र पंडित पुरूषोत्तम मुळे यांनी हनुमान जन्मकथा वाचून पूजा व अभिषेक केला. तर बसस्थानकावरील हनुमान मंदिरात उल्हास महाराज यांच्या हस्ते पूजा- अभिषेक करण्यात आला. लंके गुरूजी यांच्या घराजवळील हनुमान मंदिर, शिवाजी नगर हनुमान मंदिर, धनगर गल्ली हनुमान मंदिर, दत्तनगर हनुमान मंदिर, खोत गुरूजी मळा हनुमान मंदिर, रघुराम उखर्डे यांच्या शेतातील हनुमान मंदिर, मारवाडी गल्ली हनुमान मंदिर इ. सर्व मंदिरांत हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक मंदिरांमध्ये महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. या जन्मोत्सवासाठी भाविक भक्तांनी गर्दी केली होती.

Web Title: Jayanti Celebration in Hanuman Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.