जेरबंद केलेल्या बिबट्याला सोडले जंगलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 12:49 AM2018-06-11T00:49:57+5:302018-06-11T00:49:57+5:30
भोकरदन : शनिवारी वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरंबद केले होते. या बिबट्याने परिसरातील दोन जणांवर हल्ला करून जखमी केले होते या बिबट्याला जंगलामध्ये सोडण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात दोन दिवसांपूर्वी बिबट्या आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. शनिवारी वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरंबद केले होते. या बिबट्याने परिसरातील दोन जणांवर हल्ला करून जखमी केले होते.
रविवारी या जेरबंद केलेल्या बिबट्याला जालना येथील पशु चिकित्सालयात उपचारासाठी आणले होते.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिबट्याची तपासणी केल्यावर तो ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले. तसे लेखी प्रमाणपत्र वनविभागाने घेतल्यानंतर या बिबट्याला जंगलामध्ये सोडण्यात आले.
यावेळी वन्यजीव विशेषज्ञ प्रसाद आष्टेकर, राजेश बलांडे, एच.के. घुसिंगे, एस.डी. इटलोड, वनविभागाचे एस.आर. दोडके, पी.के. शिंदे, आर.एम. शेख, एस.एन. बुलकुले, दत्ता जाधव, व्यवहारे, पचलोरे आदींची उपस्थिती होती.
यामुळे आता पिंपळगाव रेणुकाई परिसरातील लोकांनी आता निश्वास सोडला आहे.