जीवरेखा नदीला पूर, वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:32 AM2021-09-25T04:32:22+5:302021-09-25T04:32:22+5:30

मागील तीन दिवसांपासून जीवरेखा धरण परिसरात सारखा पाऊस पडत आहे. यामुळे संपूर्ण पावसाळ्यात आतापर्यंत केवळ एक फूट पाणी आलेल्या ...

Jivarekha river floods, traffic jams | जीवरेखा नदीला पूर, वाहतूक ठप्प

जीवरेखा नदीला पूर, वाहतूक ठप्प

Next

मागील तीन दिवसांपासून जीवरेखा धरण परिसरात सारखा पाऊस पडत आहे. यामुळे संपूर्ण पावसाळ्यात आतापर्यंत केवळ एक फूट पाणी आलेल्या अकोलादेव येथील जीवरेखा धरणात मागील तीन दिवसात तब्बल १४ फूट पाणी वाढले आहे. हे धरण ओव्हरफ्लो होण्यासाठी आता फक्त अडीच फूट पाण्याची गरज आहे. परिसरात एखादा जरी पाऊस झाला तरी हे धरण ओव्हरफ्लो होईल, असा अंदाज पाटबंधारे विभागाचे बबन छडीदार यांनी वर्तविला आहे. या भागात गुरूवारी झालेल्या पावसामुळे या नदीला पूर आला होता. टेंभुर्णीसह आंबेगाव, गाडेगव्हाण, तपोवन गोंधन, डहाकेवाडी आदी गावातील नागरिकांचा संपर्क काही काळ तुटला होता.

फोटो जीवरेखा नदीला पूर आल्याने टेंभुर्णी येथून जाणारा आंबेगाव मार्ग काही वेळ बंद झाला होता. (छाया : नसीम शेख)

Web Title: Jivarekha river floods, traffic jams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.