धनश्री मानधनीच्या ‘अनटेम्ड’ संग्रहाचे जोधपुरात प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:42 AM2019-01-08T00:42:39+5:302019-01-08T00:43:13+5:30
जालन्यातील धनश्री योगेश मानधनी या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने स्वत: लिहिलेल्या ६० पैकी २५ कवितांचा समोवश असलेले अनटेम्ड या कविता संग्रहाचे प्रकाशन नुकतेच राजस्थानमधील जोधपुर येथे माहेश्वरी समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालन्यातील धनश्री योगेश मानधनी या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने स्वत: लिहिलेल्या ६० पैकी २५ कवितांचा समोवश असलेले अनटेम्ड या कविता संग्रहाचे प्रकाशन नुकतेच राजस्थानमधील जोधपुर येथे माहेश्वरी समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. त्यात भारतासह परदेशातील माहेश्वरी समाजाचे अनेक दिग्गज उद्योजक, व्यावसायिक सहभागी झाले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. याच कार्यक्रमात धनश्री मानधनीच्या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
धनश्री मानधनीचे प्राथमिक शिक्षण हे जालन्यातच झाले असून, ती सध्या मुंबईतील सिंगापूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता १२ वीमध्ये शिकत आहे. एवढ्या लहान वयात धनश्रीने समाजात वावरताना आलेले अनुभव दिसलेल्या घटना आणि अनेक भावनिक मुद्दे लक्षात घेऊन तिने एकूण ७० कवितांपैकी निवडक अशा २५ कवितांचा समावेश असलेले अनटेम्ड या कविता संग्रहात समावेश केला आहे.
दोन दिवसांपूर्वी जोधपूर येथे माहेश्वरी समाजाचे राष्ट्रीय पातळीवरील अधिवेशन झाले. त्यात देशातील बडे उद्योजक उपस्थित होते. धनश्रीच्या पुस्तकाचे प्रकाशन डी-मार्ट या कंपनीचे मालक राधाकृष्ण दमानी यांच्या हस्ते करण्यात आले. या कविता संग्रहाची एक प्रत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनाही दिल्याची माहिती धनश्रीचे वडील योगेश मानधनी यांनी दिल्याचे सांगितले.
सध्या मोबाईलच्या जमान्यात एवढ्या लहान वयात धनश्रीने ज्या कविता लिहिल्या आहेत, त्याचे उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात कौतुक केले.
कविता लिहिणे हा एका आपला छंद असून, भविष्यात आपल्यालाही वडिलांप्रमाणे उद्योग क्षेत्रात करिअर करणार असल्याचे धनश्रीने लोकमतशी बोलताना सांगितले.