जोगलादेवी बंधाऱ्यातून पाणी झेपावले मंगरूळच्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 01:02 AM2019-08-19T01:02:16+5:302019-08-19T01:02:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तीर्थपुरी : जायकवाडीच्या नाथसागर प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी रविवारी सकाळी घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी बंधा-यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तीर्थपुरी : जायकवाडीच्या नाथसागर प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी रविवारी सकाळी घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी बंधा-यात पोहोचले. तेथून दीड हजार क्युसेसने हे पाणी मंगरुळ बंधा-याच्या दिशेने जात आहे.
पैठण येथील नाथसागर प्रकल्पाची पाणी पातळी ९२ टक्के झाल्यानंतर स्वातंत्र्य दिनी १५ आॅगस्टपासून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गोदावरीच्या पात्रातून हे पाणी घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी येथे असलेल्या बंधा-यात रविवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास आले. या बंधा-याचे दोन गेट उघडण्यात आले असून, यातून रविवारी दुपारी दीड हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आले. हे पाणी मंगरूळ येथील मोठ्या बंधा-याच्या दिशेने जात आहे. सायंकाळपर्यंत तेथील बंधा-यातून हे पाणी खालील बंधा-याच्या दिशेने जाणार आहे. प्रारंभी लोणी सावंगी त्यानंतर शिवणगाव मंगरूळ व नंतर जोगलादेवी असे बंधारे पाण्याने भरले जाणार आहेत. पाण्याचा विसर्ग थोड्या थोड्या प्रमाणात वाढविण्यात येणार असल्याची माहिती उपअभियंता प्रशांत देशपांडे यांनी दिली.