जाफराबादमध्ये धरणे आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:27 AM2018-07-31T00:27:09+5:302018-07-31T00:27:13+5:30
सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सलग आठव्या दिवशी मराठा आरक्षण मागणी साठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरूच ठेवले. दिवसेंदिवस या आंदोलनास मोठा पाठिंबा मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सलग आठव्या दिवशी मराठा आरक्षण मागणी साठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरूच ठेवले. दिवसेंदिवस या आंदोलनास मोठा पाठिंबा मिळत आहे. धरणे आंदोलन, मुंडण आंदोलन हे फक्त तालुका पातळीवर मर्यादित राहीले नसून तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन पोहचले आहे.
सिपोरा आंभोरा येथील ग्रामस्थानी गावात मुंडण आंदोलन करून मुंडण आंदोलनात काढण्यात आलेले केस शासन प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार बी.के.चडोल यांच्या स्वाधीन केले आहे.या पूर्वी येथील नऊ पैकी सहा ग्राम पंचायत सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. धरणे आंदोलनास पाठींबा देण्या साठी सामाजिक आणि सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी आरक्षण मागणी साठी पाठींबा दिला आहे.त्यामुळे जाफराबाद येथील आंदोलन परळी वैजीनाथ (जि.बीड ) प्रमाणे सुरूच आहे.
वालसावंगी येथे मुुंडण आंदोलन
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे सोमवारी सकल मराठा समाजाच्या वतीने मुंडण आंदोलन करुन शासनाचा निषेध केला. यावेळी ३० आंदोलन कर्त्यानी मुंडण केले. यावेळी नारायण हिवाळे, विनोद खडके, संंदीप लोखंडे, कैलास तराळ, राजू जाधव, सुरेश काळे, किरण राजे, लक्ष्मण मळेकर, विनोद वाघ, प्रकाश पवार, विठ्ठल हिवाळे, रमेश तराळ, कल्याण तराळ, शंकर भुते, बाळू कोथलकर, लतीफ पठाण, रामू म्हस्के, राजू बावणे, कैतिक हिवाळे, सुनील खडखे ,समाधान तपकीरे, दिनेश कोथलकर, सुभाष राऊत आदींची उपस्थिती होती.