जालन्यात जुन्या वादातून युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:32 AM2018-10-17T00:32:32+5:302018-10-17T00:33:23+5:30
शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात एका युवकाचा गळा चिरुन खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दत्ता चंद्रभान उढाण (३०), रा. चंदनझिरा, जालना असे मयताचे नाव आहे. जुन्या वादातून मित्रांनीच मिळून दत्ता यांचा खून केल्याचा अंदाज पोलीसांनी वर्तविला आहे. या प्रकरणात तीन संशयीतांना ताब्यात घेतले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात एका युवकाचा गळा चिरुन खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दत्ता चंद्रभान उढाण (३०), रा. चंदनझिरा, जालना असे मयताचे नाव आहे. जुन्या वादातून मित्रांनीच मिळून दत्ता यांचा खून केल्याचा अंदाज पोलीसांनी वर्तविला आहे. या प्रकरणात तीन संशयीतांना ताब्यात घेतले आहे.
येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात एका इसमाचा मृतदेह असल्याची माहिती चंदनझिरा पोलिसांना मंगळवारी सकाळी मिळाली. पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी कर्मचाऱ्यासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मयताचे नाव दत्ता उढाण असल्याचे समोर आले. दत्ताचा गळा चिरुन खून झाल्याचे निष्पन्न झाले. मयत दत्ता उढाण हा सराईत गुन्हेगार होता अशी माहिती पोलीसांनी दिली.
सोमवारी रात्री दत्ता आणि त्यांच्या मित्रांनी शहरातील हॉटेलमध्ये दारु प्याल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले. तसेच शहरात सुरु असलेल्या गरब्याच्या ठिकाणी दाडियां खेळल्याचे सांगण्यात येत आहे. दत्ता आणि त्याचे मित्र रात्री उशिरापर्यत शहरात फिरत होते. त्यानंतर चंदनझिरा परिसरातील शासकीय आयटीआय परिसरात मोकळ्या जागेत येऊन थांबल्यावर दत्ता आणि त्यांच्या मित्रात वाद होऊन त्यातूनच दत्ता यांच्यावर तिघांनी हल्ला चढवून त्याचा गळा चिरुन खून केला असावा असा अंदाज आहे. सकाळी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान सदर घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचा असलेला दत्ता याच्या सोबत आणखी कोण कोण होते. हे पोलिसांना शोधण्यात वेळ लागला नाही. पोलिसांनी तपासाची गतीने चक्रे फिरवत तीन संशयीतांना ताब्यात घेतले.
खूनाचे तपास चक्र अंतिम टप्प्यात
दत्ता उढाण या युवकाचा खून कुठल्या कारणावरून झाला आहे याचा कसून शोध स्थानिक गुन्हे शाखा घेत आहे. संशयीतांना प्रथमदर्शनी कबूली दिली आहे परंतू, पोलीस निष्कर्षापर्यंत पोहचले नाहीत.