सेवानिवृत्तीनिमित्त कांगणे यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:33 AM2021-08-12T04:33:55+5:302021-08-12T04:33:55+5:30
जालना : शहरातील विविध भागात नागरिकांची गर्दी होत आहे. या गर्दीत अनेकजण सूचनांचे उल्लंघन करीत आहेत. मास्कचा वापर न ...
जालना : शहरातील विविध भागात नागरिकांची गर्दी होत आहे. या गर्दीत अनेकजण सूचनांचे उल्लंघन करीत आहेत. मास्कचा वापर न करणे, सुरक्षित अंतराचा नियम न पाळण्यासह इतर सूचनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा नागरिकांविरुद्ध प्रशासकीय पथकामार्फत दंडात्मक कारवाई सुरू आहे. नागरिकांनी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नानासाहेब पाटील विद्यालयात कार्यक्रम
बदनापूर : तालुक्यातील नजीक पांगरी येथील कै. नानासाहेब पाटील विद्यालयात क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास मुख्याध्यापक प्रल्हाद वाघ, विलास साळुंके, प्रभाकर ढाकणे, विजय निकाळजे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी
घनसावंगी : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे. तळीरामांच्या भांडण- तंट्यात वाढ होत असून, कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय महिला, मुलींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब पाहता संबंधितांनी लक्ष देऊन कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
घरासमोर उभा केलेला ट्रक लंपास
भोकरदन : शहरातील आन्वा रोडवर राहणारे कृष्णा आक्से यांनी शनिवारी रात्री त्यांचा ट्रक (क्र.एम.एच.२८- ८५७१) उभा केला होता. मध्यरात्रीच्या सुमारास हा ट्रक चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी कृष्णा आक्से यांनी भोकरदन ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळास फौजदार सचिन कापुरे यांनी भेट दिली.
खराब रस्त्यामुळे चालकांची कसरत
परतूर : तालुक्याचे ठिकाण असलेल्या परतूर शहराला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. थोडाही पाऊस झाला की रस्त्यावर चिखल होत आहे. या चिखलातून वाट शोधताना चालकांना कसरत करावी लागत आहे. शिवाय अपघाताचाही धोका वाढला आहे. ही बाब पाहता संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.