कानपुडे यांचा पदभार काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 01:17 AM2020-02-06T01:17:13+5:302020-02-06T01:17:40+5:30

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केशव कानपुडे यांच्याकडे सोपविण्यात आलेला अतिरिक्त मुख्याधिकारी पदाचा पदभार काढण्याचे आदेश बजावले आहेत.

 Kanpude took over | कानपुडे यांचा पदभार काढला

कानपुडे यांचा पदभार काढला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भाजपचे जालना नगर पालिकेतील गट नेते अशोक पांगारकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केशव कानपुडे यांच्याकडे सोपविण्यात आलेला अतिरिक्त मुख्याधिकारी पदाचा पदभार काढण्याचे आदेश बजावले आहेत.
भाजप गट नेते अशोक पांगारकर यांनी अतिरिक्त मुख्याधिकारी पदासाठी जालना पालिकेत अन्य अधिकारी पात्र असताना देखील त्यांच्याकडे पदभार न सोपवता शासनाचे सर्व नियम बाजूला ठेवून केशव कानपुडे यांच्याकडे सदरचा पदभार नियमबाह्यपणे सोपवल्याची तक्रार जिल्हाधिकारी बिनवडे यांच्याकडे २१ जानेवारी रोजी केली होती. चुकीच्या पध्दतीने अतिरिक्त मुख्याधिकारी पदाचा पदभार सोपवल्याप्रकरणी नियमानुसार कारवाई करावी, अशी अपेक्षा पांगारकर यांनी व्यक्त केली होती.
या तक्रारीची बिनवडे यांनी गांभीर्याने दखल घेत चौकशी केली होती. या चौकशीनंतर सध्या पालिकेच्या अतिरिक्त मुख्याधिकारी पदाचा कानपुडे यांच्याकडे सोपविण्यात आलेला पदभार तात्काळ काढून सदर पदभार उपमुख्याधिकारी महेश शिंदे यांच्याकडे सोपविण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. नगर विकास विभागाच्या नियमानुसार करनिर्धारक व प्रशासकीय सेवा या संवर्गातील कर्मचाºयाला अतिरिक्त मुख्याधिकारी पदाचा पदभार देता येत नाही, असा निर्वाळा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. दरम्यान आपण नियमानुसारच या पदावर कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title:  Kanpude took over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.