११ जणांवर २८ दिवस राहणार लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 12:19 AM2020-03-20T00:19:26+5:302020-03-20T00:21:15+5:30
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या भीतीने जालना जिल्ह्यातील ३२ पैकी १९ प्रवासी परदेशातच आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या भीतीने जालना जिल्ह्यातील ३२ पैकी १९ प्रवासी परदेशातच आहेत. परदेशातून आलेल्या ११ जणांच्या घरी प्रशासनाने भेटी दिल्या आहेत. त्यांची तपासणी करून त्यांच्यावर २८ दिवस प्रशासन नजर ठेवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देशातही हा विषाणू चोर पावलांनी दाखल झाला आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण आढळून आले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या व्हायरसच्या बचावासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. जिल्हा प्रशासनानेही खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्वच कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले आहे. तसेच विविध पथकांमार्फत बाहेरील राज्य व परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवली जात आहे. दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी परदेशात गेलेल्या नागरिकांची माहिती पोलिसांकडून मागविली होती.
यात ३२ जण परदेशात असल्याचे समोर आले. ३२ जणांची तपासणी केली असता १९ जण परदेशात असून, ११ जण जिल्ह्यात परतले आहे.
या ११ जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यांच्यावर घरीच नजर ठेवली जात आहे. उवर्रित दोघांपैकी एकाला डिर्चाज मिळाला आहेत, तर एक धुळ््यात असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात चाळीस जणांचे विलगीकरण केले असल्याचे सांगण्यात आले.
ँपुणे: मुंबईच्या प्रवाशांची तपासणी
पुणे व मुंबई येथे कोरोनाच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पुणे व मुंबई येथे नोकरीसाठी गेलेले जिल्ह्यातील नागरिक परत येत आहे. या नागरिकांची जालना-औरंगाबाद रोडवरील वरूडी येथे तपासणी करण्यात येत आहे.
येथे आरटीओ व आरोग्य विभागाचे पथक प्रवाशांची तपासणी करीत आहे. मागील चार दिवसांपासून ही तपासणी सुरू असून, गुरूवारी या पथकाने ४० गाड्यांमधील ६५० प्रवाशांची तपासणी केली आहे.
जिल्ह्यातील ३२ पैकी १९ जण हे परदेशात आहे. त्यातील ११ जणांची पाहणी करण्यात आली असून, त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे. इतर दोघांपैकी एकास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर एक जण धुळ््यात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी सांगितले.