रेल्वे ट्रॅकवर नजर ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 01:28 AM2018-07-01T01:28:14+5:302018-07-01T01:29:07+5:30
सुरक्षित रेल्वे प्रवास करण्यासाठी रूळांची नियमितपणे देखभाल व दुरूस्ती करण्याचे निर्देश नांदेड येथील विभागिय रेल्वे व्यवस्थापक जे. राभा यांनी शनिवारी येथे दिले.
ल्ोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गेल्या काही वर्षांमध्ये मनमाड ते हैदराबाद या मार्गावरील रेल्वे वाहतूकीत मोठी वाढ झाली आहे. हा एकेरी मार्ग असल्याने या रेल्वे रूळांवर जास्त भार पडतो. त्यामुळे सुरक्षित रेल्वे प्रवास करण्यासाठी रूळांची नियमितपणे देखभाल व दुरूस्ती करण्याचे निर्देश नांदेड येथील विभागिय रेल्वे व्यवस्थापक जे. राभा यांनी शनिवारी येथे दिले.
शनिवारी त्यांनी जालना, परतूर या रेल्वे स्थानकास भेटी दिल्या. यावेळी राभा यांनी रेल्वेस्थानक परिसरातील स्वच्छतेसह अन्य विकास कामांची पाहणी केली. स्वच्छतेच्या संदर्भात सुधारणा झाल्याचे समाधान त्यांनी यावेळी बोलून दाखवले.
यावेळी त्यांच्या समवेत मंडल वाणिज्य प्रबंधक नेहा रत्नाकर, बी. के. पांडे आदींची उपस्थिती होती.
परतूर येथील रेल्वेस्थानकाचीही राभा यांनी पाहणी केली. त्यावेळी तेथील व्यापाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन सचखंड रेल्वेला परतूर येथे थांबा देण्याची मागणी केली. तसेच रखडलेल्या उड्डाण पुलाचे काम गतीने करण्याची सूचना करून यामुळे येथील वाहतूक कोंडी थांबेल, असे सांगितले. यावेळी मोहन अग्रवाल, बाबासाहेब तेलगड, प्रकाश सोळंके, रहीम कुरेशी यांच्यासह प्रवासी संघटनेच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.
दरम्यान, बदनापूर रेल्वे स्थानकावरही व्यवस्थापकांनी थांबून पाहणी केली. यावेळी गजानन गिते, विष्णू शिंदे, शिवाजी चाळगे, संजय ज-हाड, अरूण राजपूत, कैलास खेंडके, केदारनाथ ढाकणे, अमोल दाभाडे, सुदर्शन शिंदे आदींनी व्यवस्थापकांची भेट घेऊन त्यांना मागण्याचे निवेदन दिले. बदनापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसुविधांसाठी अद्ययावत यंत्रणा उभारण्याची मागणी करण्यात आली.
विभागीय व्यवस्थापक राभा यांनी एक ते दीड तास जालन्यात थांबून अधिका-यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी रेल्वे गेटजवळ उभारण्यात येणाºया भुयारी मार्गासंदर्भात त्यांना विचारले असता, या मार्गाला अद्याप महसूल विभागाकडून परवानगी मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.