खाटिक समाजाने विचारांची दिशा बदलावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:46 AM2017-11-28T00:46:10+5:302017-11-28T00:46:51+5:30
जालना : खाटिक बांधवांनी वैचारिक दिशा बदलून मुलांना चांगले शिक्षण द्यावे, असे प्रतिपादन मुस्लिम खाटिक सेवा संस्थेचे प्रदेशाध्यक्ष हाजी ...
जालना : खाटिक बांधवांनी वैचारिक दिशा बदलून मुलांना चांगले शिक्षण द्यावे, असे प्रतिपादन मुस्लिम खाटिक सेवा संस्थेचे प्रदेशाध्यक्ष हाजी आरफात शेख यांनी केले.
राज्य मुस्लिम खाटिक समाजसेवा संस्थेच्या वतीने डॉ. फ्रेजर बॉईज हायस्कूलच्या क्रीडांगणावर सोमवारी आयोजित खाटिक समाज मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी जमील मौलाना, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, माजी आ. संतोष सांबरे, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, अभिमन्यू खोतकर, डॉ. बद्रोद्दीन, अब्दुल रशीद जावेद कुरेशी, इलियास कुरेशी, जिल्हाध्यक्ष शकील कुरेशी, पंडितराव भुतेकर, विष्णू पाचफुले, बाला परदेशी, रऊफ परसूवाले, अॅड. शेख, डॉ. वसीम कुरेशी, सोफियान कुरेशी, डॉ. रियाज शेख, हुस्नोद्दीन कुरेशी, गुलाम उमापूरवाले, हाफीज मल्लिक कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
हाजी शेख म्हणाले की, लवकरच मुंबईत राज्यपातळीवरचा समाज मेळावा घेणार आहोत. राज्यमंत्री खोतकर यांनी खाटिक समाजाच्या दुकान, नाबार्डमार्फत कर्जाची व्यवस्था अशा अनेक मागण्या मान्य केल्या असल्याचा आनंद असल्याचे आरफात शेख यांनी सांगितले. उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी व्यवसाय बंदी उठवावी व चामड्याला शेतमालाप्रमाणे हमीभाव मिळावा यासाठी संघटित होण्याची गरज व्यक्त केली.
शकील कुरेशी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एम. ए. मुक्तगीर सूत्रसंचालन केले. तर मुफशीर कुरेशी यांनी आभार मानले. यावेळी मुस्ताक कुरेशी, बु्-हाण, कुरेशी, महंम्मद हनीफ, वहाब कुरेशी, अबुजर कुरेशी, अरफान कुरेशी, तौसिफ कुरेशी, रशीद कुरेशी, राजेक कुरेशी, जुबेर कुरेशी, अबरान कुरेशी, महंमद अहेसान, रहीम तांबोळी यांच्यासह समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.