...अन खोतकरांनी मैदानाचा ताबा घेतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:37 AM2018-12-24T00:37:43+5:302018-12-24T00:37:47+5:30
ज्या क्षणी पंचांनी शेवटची अर्थात महाराष्ट्र कुस्ती किताबासाठीच्या लढीची घोषणा केली अन् संयोजक तथा स्वागताध्यक्ष राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी गादी गट मैदान क्रमांक दोनचा ताबा घेतला
संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : ज्या क्षणी पंचांनी शेवटची अर्थात महाराष्ट्र कुस्ती किताबासाठीच्या लढीची घोषणा केली अन् संयोजक तथा स्वागताध्यक्ष राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी गादी गट मैदान क्रमांक दोनचा ताबा घेतला. कुस्ती सुरू होण्यापूर्वी खोतकर व्यासपीठ सोडून गादीगटाची कुस्ती होणाऱ्या मैदानावर पोहोचले. त्यांनी सहा मिमिटांची कुस्ती सुरू असताना मैदानावर गोल फिरून सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन ते करत होते. कुस्ती संपल्यावर शेख विजयी झाला अन् त्याच्या समर्थकांनी थेट गादी गटाच्या मैदावर उड्या घेतल्या. त्या येणाºया मॉबमधील एकाला तर खोतकर यांनी अक्षरश: दोन्ही हातांनी ढकूलन दिले.
कुस्तीस्पर्धा शांततेत पार पडत असतानाच शनिवारी पंचाच्या निर्णयावर वाद होऊन किरकोळ वाद झाला होता. त्या वादाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यातच पुन्हा कुठलेही गालबोट लागू नये म्हणून अर्जुन खोतकर हे स्वत: अत्यंत सजग होते.
कुस्ती संपल्यावर पंधरा ते वीसजण अचानक कठडे तोडून थेट मैदावर घुसल्याने खोतकर जाम चिडले होते. त्यांनी चटकन आक्रमक होत. त्या सर्व मॉबला त्यांनी अक्षरश: आडवे येत थोपवले. कुस्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. गर्दी लक्षात घेऊन मैदाना बाहेर मोठा स्क्रीन लावण्यात आला होता. त्यामुळे अनेकांना कुस्तीचा आनंद घेता आला.
बजरंग बली की..जय...च्या
घोषणेने दुमदुमला आसमंत
महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या शेवटच्या सहा मिनिटांमध्ये कुस्तीप्रेमींचा उत्साह शिगेला पोहचला होता. सर्वत्र उत्साही वातावरण होते. त्यातच बजरंग बली की, जय या घोषणेने आसमंत दुमदूमून गेला होता.
ज्यावेळी दोन्ही मल्ल कुस्तीसाठीच्या गादीवर आले. त्यावेळी उपस्थितांनी आपले श्वास रोखून धरले होते. सर्वत्र एवढी शांतता पसरली की, टाचणी पडली तरी आवाज येईल. परंतु पहिल्या दोन मिनिटातच गतविजेता अभिजित कटकेने बालारफिकला थेट आखाड्या बाहेर फेकून दिल्यावर एकच जल्लोष करण्यात आला. परंतु नंतर कुस्तीने रंग बदलला. प्रारंभी अभिजितच्या ताब्यात ही कुस्ती सहज येईल असा उत्साह अभिजितमध्ये होता. परंतु आखाड्या बाहेर फेकल्यानंतर पुन्हा मैदानावर आलेल्या बालारफिकने फिनिक्स भरारी घेतली.
एकापेक्षा एक ऐकरी आणि दुहेरी पटाचे डाव टाकून स्वत:ची गुणतालिका हलती ठेवली. प्रारंभापासूनच बाला रफिक शेखचा आत्म विश्वास व एकाग्रता दिसून येत होती. सहा मिनिटांच्या या थरारात शेवटी बालारफिकने बाजी मारली अन् प्रतिष्ठेचा महाराष्ट्र केसरी किताबावर नाव कोरले. तो विजयी झाल्याचे पंचानी जाहीर करताच टाळ्या वाजवून त्याचे उपस्थितांनी उभे राहून स्वागत केले. आपल्या मुलाची कुस्ती पाहण्यासाठी बालारफिकचे आई-वडिलही मैदावर हजर होते. कुस्तीत बाजी मारल्याचे कळताच त्यांचाही आनंद व्दिगुणित झाला होता.
नुरा कुस्ती तर नाही..ना.. -मुंडे
कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार हे येणार होते. परंतु ते गोंदिया जिल्ह्यात गेल्याने ते येऊ शकले नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे बक्षीस वितरणासाठी ऐन वेळी निमंत्रणावरून येथे आल्याने कार्यक्रमास चारचाँद लागले. त्यांनी यावेळी त्यांच्या खास शैल्ीात दमदार आवाजात प्रारंभी आयोजकांचे कोतुक केले. परंतु नंतर त्यांनी सांगितले की, तुम्ही लाल मातीच्या कुस्तीत माहीर आहात तर आम्ही राजकीय डावपेचात माहीर आहोत.
येथे शिवसेनेचा मित्रपक्ष असलेला भाजपचा एकही पदाधिकारी दिसत नसल्याने तुमची ही कुस्ती अर्थात आगामी लोकसभेचा संदर्भ देत तुमची आणि त्यांची युती होणार की नाही हे अद्याप जाहीर झाले नसले तरी तुम्ही स्वतंत्र लढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याने ही नुरा कुस्ती तर नाही ना, असा मिश्किल टोला लगावून सर्वांना खळखळून हसवले.
राजेश टोपेंकडून एक लाख रूपयांची घोषणा
यावेळी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत किताब मिळवलेल्या बाला रफिक शेख यांना एक लाख रूपयांचे बक्षिस देण्याची घोषणा केली. तसेच अर्जुन खोतकरांनी ही कुस्ती स्पर्धा जालन्यात भरवून क्रीडा वातावरण तयार केले. यातून मराठवाड्यातील पहिलवानांना निश्चितच पे्ररणा मिळेल असे सांगून यातून खिलाडू वृत्ती जोपसण्यास मदत होणार आहे. सध्या सर्वत्र क्रिकेटला महत्व दिले जात आहे. परंतु अस्सल भारतीय खेळ असलेल्या कुस्तीला यामुळे एक प्रकारे राजाश्रय मिळाल्याचे आ. राजेश टोपे यांनी सांगितले.