लालपरीत पुन्हा खटखट ; तिकीट मशीन दुरूस्ती करायला एसटीकडे पैसा नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:31 AM2021-07-28T04:31:30+5:302021-07-28T04:31:30+5:30
जालना : कोरोनाच्या संकटावर मात करून एसटी रूळावर येत असतानाच तिकीट मशीन बिघडल्याने वाहकांना आता पुन्हा हातात ट्रे घेऊन ...
जालना : कोरोनाच्या संकटावर मात करून एसटी रूळावर येत असतानाच तिकीट मशीन बिघडल्याने वाहकांना आता पुन्हा हातात ट्रे घेऊन खटखट करावी लागत आहे. मशीन खरेदी व दुरूस्तीसाठी पैसे नसल्याने वाहकांना आता ट्रे शिवाय दुसरा पर्याय नाही. जिल्ह्यात एकूण चार आगार असून, या आगारांमध्ये ५३८ मशीन आहेत. त्यापैकी १२५ मशीन बंद असल्याचे सांगण्यात आले.
एसटी नियंत्रक कोट
सध्या काही वाहकांचे मशीनवर तर काहींचे ट्रे तिकीटावर काम सुरू आहे. आपल्या जिल्ह्यात ५३८ मशीन असून, त्यापैकी केवळ १२५ मशीन बंद पडल्या आहेत.
- प्रमोद नेहूळ, विभाग नियंत्रक, जालना
वाहकांची पुन्हा आकड्यांची जुळवाजुळव
तिकीट मशीनवर वाहकांना हिशेब करणे सोपे जात होते. प्रवाशाला तिकीट देताना ही अडचण येत नव्हती. परंतु, आता मशीन नसल्यामुळे आकड्यांची जुळवाजुळव करावी लागत आहे. तब्बल १२५ तिकीट मशीनमध्ये बिघाड झाला आहे. ४१३ मशीन सुरू आहेत. यामुळे वाहकांची गैरसोय होत आहे. मशीन पुरवठा करणाऱ्या एजन्सीचा ही कालावधी संपत आला आहे.
पगार मिळतोय हेच नशीब
गेल्या दीड वर्षांपासून जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या काळातही एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना वेतन दिले जात आहे. परंतु, मशीन बंद पडल्याने त्यांना सुधारण्यासाठी पैसे नसल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.
दुष्काळात तेरावा...
n २०० पैकी १५८ बसेस सुरू आहेत. तब्बल ४० बसेस बंद आहेत.
n दिवसाला महामंडळाला केवळ १५ लाखांचे उत्पन्न मिळत आहे. जवळपास ७ लाखांचे उत्पन्न घटले आहे.