कोविडची लस ताप नव्हे संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:31 AM2021-01-25T04:31:41+5:302021-01-25T04:31:41+5:30
तर जे श्रीमंत आहेत, त्यांचे उत्पन्न कमी झाल्याने ते चिंतातुर होते. एकूणच यावर उपाय म्हणून संपूर्ण जगालाही काहीच माहिती ...
तर जे श्रीमंत आहेत, त्यांचे उत्पन्न कमी झाल्याने ते चिंतातुर होते. एकूणच यावर उपाय म्हणून संपूर्ण जगालाही काहीच माहिती नव्हते. वैद्यकीय क्षेत्रासाठी हे मोठे आव्हान होते. अनेकांनी कोविडपासून वाचण्यासाठी जेवढ्याा काही पॅथी आहेत, त्यांचा उपयोग केला. तर अनेकांनी आयुर्वेदात सांगितलेले उपाय करून स्वत:ला वाचविण्याचे प्रयत्न केले. अनेकांच्या घराघरात काढा संस्कृती रूजली होती. कोणी काहीही सांगावे आणि ते प्रत्यक्षात आणू नये असे क्वचितच झाले. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीच्या बाबींचे मार्केट केवळ तेजीत नव्हे तर विक्रमी तेजीत होते. कधीही हातपाय न हलविणाऱ्यांनी योग साधनेतील अवघडातील अवघड आसने करून स्वत:ला सिद्ध करण्याचे प्रयत्न केले. त्यातून अनेकांना चांगला लाभही झाला ही एक सकारात्मक बाब म्हणावी लागेल.
या कोविडवर मास्क, सुरक्षित अंतर आणि स्वच्छतेला महत्त्व प्राप्त झाले. पायातले जोडे हे दरवाजाबाहेर काढण्याची पद्धत पुन्हा रूजू झाली. घरातील जेवन हेच सर्वोत्तम मानले जाऊ लागले. अशातच सर्वांना परिवार आणि आपल्या गावाचे आणि पूर्वीपासून आत्मनिर्भर असलेल्या शेतीला सुगीचे दिवस झाले.
हे सर्व होत असताना जगभरातील शास्त्रज्ञ मात्र, कोराेना विषाणूवर प्रभावी लस शोधण्यात मग्न होते. दिवस-रात्र एक करून भारताच्या जवळपास बऱ्याच कंपन्यांनी ही लस शोधण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले आणि लस शोधली देखील.ही लस १६ जानेवारीपासून आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्याचा मुहूर्त ठरला आणि तो प्रत्यक्षात आणला. परंतु नंतर ज्यांनी कोविन ॲपवर नोंदणी केली अशा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना लस घेण्यासाठी रेडकार्पेट टाकावे लागत आहे. लसीबद्दल गैरसमज पसरू नये म्हणून आता डॉक्टरही मैदानात उतरले आहेत. एकूणच कुठलीही लस ही तुमची प्रतिकारशक्ती वाढविणारीच असते. त्यमुळे याबद्दलचा गैरसमज दूर होणे गरजेच आहे. आज वैद्यकीय कर्मचारीच जर मागे हटत असतील तर सामान्यांची भीती दूर होणार कशी हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ही लस ताप नव्हे संजीवनीच ठरेल अशी आशा करणे गैर ठरणार नाही.