कृषी संजीवनी प्रकल्प ‘वरदान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 01:01 AM2020-01-19T01:01:48+5:302020-01-19T01:02:35+5:30

शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने शासनाने जागतिक बॅकेच्या साहाय्याने राज्यात २०१८ साली नानाजी देशमुख कृषी प्रकल्प सुरू केला. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी ‘वरदान’ ठरत असून, दोन वर्षात २६३६ लाभार्थ्यांना या प्रकल्पाचा लाभ मिळाला आहे

Krishi Sanjivani project 'boon' | कृषी संजीवनी प्रकल्प ‘वरदान’

कृषी संजीवनी प्रकल्प ‘वरदान’

Next

दीपक ढोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने शासनाने जागतिक बॅकेच्या साहाय्याने राज्यात २०१८ साली नानाजी देशमुख कृषी प्रकल्प सुरू केला. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी ‘वरदान’ ठरत असून, दोन वर्षात २६३६ लाभार्थ्यांना या प्रकल्पाचा लाभ मिळाला आहे. या शेतकºयांना २० कोटी ७५ लाख रूपयांचे अनुदान वाटप करण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून मराठवाडा व विदर्भातील शेतक-यांना दुष्काळास सामोरे जावे लागत असून, याचा भूगर्भातील पाणी साठ्यावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे. तसेच पूर्णा नदीच्या खो-यातील भू-भाग हा निसर्गत: क्षारपड असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहे. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अल्पभूधारक शेतकºयांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले. हवामान बदलामुळे उध्दभवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास, शेतक-यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने राज्यात जागतिक बँकेच्या साहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू केला आहे.
या प्रकल्पाअंतर्गत शेतक-यांना फळबाग, सामूहिक शेततळे, ठिंबक सिंचन, तुषार सिंचन, इलेक्ट्रिक मोटार, पीव्हीसी पाईप, शेडनेट, रेशीम इ. बाबींवर अनुदान देण्यात येते. जालना जिल्ह्यातही हा प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पाचा लाभ अनेक शेतकरी घेत आहेत.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या तिस-या टप्प्यात १०८ गावांची निवड करण्यात आली. या गावात गाव समित्या स्थापन करण्याचे काम सुरू असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
तिसºया टप्प्यात बीबी, बोरगाव, खोलवाडी, पिंपळवाडी, सेवली, जळगाव, घाणेवाडी, गोकुळवाडी, निधोना, सारवाडी, नादापूर, देवनगर, कृष्णानगर, कोटी, देवळाई अंबड, राजेगाव, वालसावंगी, फत्तेपूर, पद्मावती, तपोवन, जयपूर, वझर सरकटे, तळेगाव, उस्वद, पांगरी इ. गावांची निवड करण्यात आली.
या प्रकल्पासाठी प्रकल्प कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेषज्ञ नित्यानंद काळे, विशाल डेंगळे हे कामे करीत आहेत.
उर्वरित अर्जावर पूर्वसंमती
देण्याची प्रक्रिया सुरू
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी ३६३ गावांमधील १ लाख ६० शेतक-यांनी अर्ज दाखल केले आहेत. यातील २१ हजार ६९९ अर्जांना पूर्वसंमती देण्यात आली असून, २६३६ लाभार्थ्यांना प्रत्यक्षात अनुदान मिळाले आहे. उर्वरित अर्जांवर गाव समित्या व कृषी विभाग काम करत असून, या अर्जांनाही तातडीने पूर्वसंमती देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
शेतकरी गट व महिला बचत गटाला कृषी निगडीत व्यवसायासाठी दिले जाते ६० टक्के अनुदान
सामूहिक शेततळ््यासाठी १०० टक्के अनुदान
फळबागेसाठी १०० टक्के अनुदान
विद्युत मोटार, पीव्हीसी पाईप ७० टक्के अनुदान, ठिबक व तुषारसाठी ८० टक्के अनुदान मिळते.

Web Title: Krishi Sanjivani project 'boon'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.