कुडे यांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:25 AM2020-12-25T04:25:18+5:302020-12-25T04:25:18+5:30

फोटो परतूर : तालुक्यातील श्रीराम तांडा येथील जिल्हा परिषद शाळेतील सहशिक्षक जगदीश कुडे यांनी सादर केलेले ‘बालकांचे स्थलांतर क्षेत्रातील ...

Kude's work received national attention | कुडे यांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल

कुडे यांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल

Next

फोटो

परतूर : तालुक्यातील श्रीराम तांडा येथील जिल्हा परिषद शाळेतील सहशिक्षक जगदीश कुडे यांनी सादर केलेले ‘बालकांचे स्थलांतर क्षेत्रातील शालेय नेतृत्वाची महत्त्वाची भूमिका’ हे मॉडेल राष्ट्रीय पातळीवर दर्जेदार ठरले आहे. याबद्दल कुडे यांचा गटसाधन केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कुडे यांचे मॉडेल राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था नवी दिल्ली यांच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आले आहे. त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संंस्था (एमआयपीए) औरंगाबाद व राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (एनआयपीए) नवी दिल्ली यांनी घेतली आहे. याबद्दल गटसाधन केंद्राच्या वतीने कुडे यांचा सत्कार करण्यात आला. विस्ताराधिकारी प्रेरणा हरबडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी संतोष साबळे, केंद्रप्रमुख एन. बी. धुमाळ, आर. जी. जोशी, रायमुळे, गटसमन्वयक कल्याण बागल, रमेश कुलकर्णी, बाबासाहेब भापकर, राम बागल, कैलाश जाधव, देवकर,चव्हाण, गौतम पाईकराव आदींची उपस्थिती होती.

Web Title: Kude's work received national attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.