४१ प्राथमिक आरोग्य केंद्रांत अग्नीशमन यंत्रणेचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:35 AM2021-01-16T04:35:31+5:302021-01-16T04:35:31+5:30

जिल्ह्यात ४१ प्राथिमक आरोग्य केंद्रे आहेत. या आरोग्य केंद्रांतर्गत सातशेवर गावातील नागिरकांना प्रथमोपचाराची सेवा दिली जाते. लसीकरणासह इतर शासकीय ...

Lack of fire fighting system in 41 primary health centers | ४१ प्राथमिक आरोग्य केंद्रांत अग्नीशमन यंत्रणेचा अभाव

४१ प्राथमिक आरोग्य केंद्रांत अग्नीशमन यंत्रणेचा अभाव

googlenewsNext

जिल्ह्यात ४१ प्राथिमक आरोग्य केंद्रे आहेत. या आरोग्य केंद्रांतर्गत सातशेवर गावातील नागिरकांना प्रथमोपचाराची सेवा दिली जाते. लसीकरणासह इतर शासकीय योजनांची अंमलबजावणीही या केंद्रांमधील आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत केले जाते. या आरोग्य केंद्रांमध्ये येणाऱ्या रूग्णांसह नातेवाईकांची संख्याही मोठी आहे. जिल्ह्यातील बहुतांश आरोग्य केंद्रांमध्ये अग्निशमन यंत्रणेचा अभाव आहे. काही आरोग्य केंद्रांच्या इमारतींची अवस्थाही बिकट झाली आहे. त्यामुळे तेथील विजेच्या वायरिंगसह इतर अनेक प्रश्न कायम आहेत. भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आणि शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने केंद्रप्रमुखांनी फायर ऑडिट, इलेक्ट्रीक ऑडिट आणि स्ट्रकक्चरल ऑडिट वेळेवर करून घ्याव्यात, अशा सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, ज्या बांधकाम विभागाकडे शासकीय इमारतींचे ऑडिट करण्याची जबाबदारी आहे तेथील अधिकारी या कामी सहकार्य करीत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या बाबीकडे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील इलेक्ट्रीक ऑडीट, फायर ऑडीट, स्ट्रक्चरल ऑडीट वेळोवेळी करण्याबाबत केंद्र प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर असलेले सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

-डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

जिल्ह्यातील आरोग्य केंद्रे

४१

जालना- ०६, बदनापूर- ०४, अंबड- ०६, भोकरदन- ०८, जाफराबाद- ०४, मंठा- ०४, परतूर- ०४, घनसावंगी- ०५

Web Title: Lack of fire fighting system in 41 primary health centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.