वृध्दाचे हात-पाय बांधून लाखो रुपयांचा मुद्देमाल केला लंपास; पोलिसांनी रात्रभरातूनच २ ट्रकसह ५ आरोपी घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 04:57 PM2019-02-01T16:57:01+5:302019-02-01T17:01:10+5:30
रात्रभरातूनच पोलिसांनी ५ चोरट्यांना जेरबंद केले.
घनसावंगी (जालना) : एका ५० वर्षीय वृध्दाला चोरट्यांनी बांधून त्यांच्या घरातील वीस सोयबीनच्या गोण्या, एक बकरी व रोख रक्कम अडीच हजार रुपये लंपास केल्याची घटना घनसांवगी तालुक्यातील शिंदखेड येथे गुरुवारी रात्री दहा वाजता घडली. दरम्यान, रात्रभरातूनच पोलिसांनी ५ चोरट्यांना जेरबंद केले.
अनिल बिसराम शिंद (४२, रा. तेरखेडा ता. वाशी, जि. उस्मानाबाद), राजेंद्र भास्कर काळे (३८, रा. अंधोरा ता. वाशी) व तीन विधीसंघर्षग्रस्त मुले असे संशयित आरोपींची नावे आहे.
अंबड- पाथ्री रोडवरील शिंदखेड येथील शेतकरी लक्ष्मण आश्रुबा सावंत (५०) हे गुरुवारी रात्री ९ वाजेच्यासुमारास शेतातील पत्राच्या शेडमध्ये झोपले असताना पाच जणांनी घेऊन जागे केले. त्यानंतर त्यांचे हात- पाय बांधून तोडात रुमाल घातला. या चोरट्यांनी पत्राच्या शेडमधील २० सोयाबीनच्या गोण्या, एक बकरी व दोन पिल्ले, अडीच हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. दरम्यान, रात्री १० वाजेच्यासुमारास पोलीस पेट्रोंलिग करुन येत असतांनाच पोलिसांना लक्ष्मण सावंत दिसले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून विचारपूस केली असता, त्यांनी घडलेली हकीगत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची यंत्रे फिरवत ५ आरोपींना ताब्यात घेतले.