वृद्धाचे हातपाय बांधून मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 12:37 AM2019-02-02T00:37:13+5:302019-02-02T00:37:47+5:30
एका ५० वर्षीय वृध्दाचे हात-पाय बांधून चोरट्यांनी त्यांच्या घरातून वीस सोयबीनच्या गोण्यांसह तीन बकऱ्या व रोख रक्कम अडीच हजार असा एकूण ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घनसांवगी तालुक्यातील शिंदखेड येथे गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.
घनसावंगी : एका ५० वर्षीय वृध्दाचे हात-पाय बांधून चोरट्यांनी त्यांच्या घरातून वीस सोयबीनच्या गोण्यांसह तीन बकऱ्या व रोख रक्कम अडीच हजार असा एकूण ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घनसांवगी तालुक्यातील शिंदखेड येथे गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, रात्रीतूनच पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेवून ५ जणांना जेरबंद केले.
अनिल बिसराम शिंदे (४२, रा. तेरखेडा ता. वाशी, जि. उस्मानाबाद), राजेंद्र भास्कर काळे (३८, रा. अंधोरा ता. वाशी) व तीन अल्पवयीन आरोपी असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहे.
घनसावंगी येथील शिंदखेड शिवारातील शेतवस्तीवरील पत्राच्या शेडमध्ये लक्ष्मण आश्रुबा सावंत (५०) हे गुरुवारी रात्री झोपलेले असताना पाच दरोडेखोरांनी हल्ला करुन त्यांना शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केली. त्यानंतर त्यांचे हात-पाय बांधून तोडात रुमाल घातला. चोरट्यांनी शेडमध्ये ठेवलेल्या सोयाबीनच्या २० गोण्या, एक दुचाकी, तिन बकºया व रोख रक्कम २५०० रुपये असा एकूण ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
दरम्यान, पिंपळगावहुन पेट्रोलिंग करुन येत असतांना पोलीस या ठिकाणाहुन जात होते. पोलिसांच्या गाडीचा आवाज ऐकुन सावंत हे उड्यामारत रोडवर गेले. त्यानंतर सावंत यांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
यानंतर पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी कर्मचाºयासह या दोन्ही ट्रकचा पाठलाग करुन एक ट्रक आष्टी रोडवर पकडला. त्यानंतर दुसºया ट्रकचा पाठलाग सुरु केला. हा ट्रक माजलगावकडे जात असल्याने पाथरी, माजलगाव व किल्ले धारुर या पोलिस ठाण्यांना याची माहिती देण्यात आली.
या सर्व पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करुन किल्ले धारुर येथे हा ट्रक पकडला. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुध्द घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोउपनि. एस. एस. बोडखे हे करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी सी. डी. शेवगण यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. शिवाजी बंटेवाड, कर्मचारी संदीप विल्मीक पाटील, आत्माराम घुले, बाबासाहेब हरणे, विलास गाढेकर, रंजित खटावकर यांनी केली. या पोलीसांच्या तत्पर कामागीरी बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लक्ष्मण सावंत जखमी
चोरट्यांनी मारहाण केल्यामुळे लक्ष्मण सावंत हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.