जमीनीचे क्षेत्रच गायब, शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 01:02 AM2018-10-15T01:02:24+5:302018-10-15T01:04:03+5:30
धावडा येथील गट कं्रमाक ९८ मधिल काही एकर जमीन ही त तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी संबंधित शेतकºयांच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, चार वर्षानंतरही ही जमीन शेतकºयांच्या नावावर न झाल्याने अडचण निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : धावडा येथील गट कं्रमाक ९८ मधिल काही एकर जमीन ही त तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी संबंधित शेतकºयांच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, चार वर्षानंतरही ही जमीन शेतकºयांच्या नावावर न झाल्याने अडचण निर्माण झाली आहे.
ज्या शेतकºयांनी एकवर्षा पेक्षा जास्त गायराण जमीनीवर अतिक्रमण केल्याचे चौकशीत आढळून आले अशा २२ शेतकºयाना तात्कालीन सहाय्यक जिल्हाअधिकारी संजीवकुमार यांनी ९८ गट क्रमांकातून मारोती साबळे, १ हेक्टर २० आर, काशीनाथ निकाळजे २ हेक्टर, कचरू इंगळे, १ हेक्टर २० आर रामदास इंगळे १ हेक्टर २० आर, भीमराव साबळे १ हेक्ब्टर २० आर, सुगरनबाई खैरे १ हेक्टर ६० आर, जममुनाबाई वैरी १ हेक्टर २० आर, अलकाबाई पारव १ हेक्टर २० आर, भाऊलाल वैरी १ हेक्टर २० आर, शेख इब्राहीम १ हेक्टर २० आर, शेख कलाम १ हेक्टर २० आर, शेख रऊफ २ हेक्टर, शेख बिसमिल्ला २ हेक्टर शेरखॉ सरदारखॉ १ हेक्टर ६० आर, शेख मसुद शेख गफुर २ हेक्टर, युसूफखॉ अजगरखाू २ हेक्टर, कलाबाई बिरभाड १ हेक्टर २० आर, सय्यद शेकुर सय्यद गफुर १ हेक्टर ६० आर, उत्तम निकाळजे १ हेक्टर २० आर, नामदेव इंगळे १ हेक्टर २० आर अशी पती - पत्नीच्या नावे जमीन करण्यात येऊन त्या संबधी या शेतकºयाची सातबारा उताºयावर त्याची नावे घेण्यात आली होती. या शेतकºयानी सदरील शेतीवर बँकेकडून पिककर्ज सुध्दा घेतले, मात्र गेल्या चार वर्षा पासून पोटखराब असल्याच्या कारणा वरून शेतकºयाच्या सातबारावरील नावा समोरून जमीनचे क्षेत्रच गायब झाले आहे. त्यामुळे या शेतकºयांना या शेतीचा केवळ कसण्यासाठीच उपयोग होत असुन पीककर्ज घेता येत नाही. शासनाने यावर्षी पीककर्ज माफीमध्ये काही शेतकºयाची कर्जमाफी सुद्धा झाली आहे, तर काहींनी १ लाख ५० हजार माफीनंतर उर्वरित राहिलेली रक्कम सुध्दा बँकेत भरणा केली. मात्र, नव्याने कर्ज घेण्यास गेल्यावर सातबारा उताºयामध्ये या शेतकºयांची नावे आहेत. मात्र, नावासमोरील जमीनीचे क्षेत्रच गायब झाले आहे सुरूवातील आॅनलाईन सातबाºयामध्ये काही बिघाड झाली म्हणून काही दिवस या शेतकºयांनी तलठ्याकडे वचारणा केली. मात्र, त्यात तसे काही चुकीचे झाले नसल्याचे दिसून आल्याने शेतकºयांची अडचण कायम आहे .
शेतकरी : जिल्हाधिकाºयांनी लक्ष द्यावे
भोकरदन तालुक्यातील धावडा येथील गट क्रमांक ९८ मधील काही शेत जमीन ही तत्कालीन सहायक जिल्हाधिकारी संजीव कुमार यांनी संबंधित शेतकºयांच्या नावावर करून दिली होती. मात्र, त्यातील तांत्रिक दोष आजही १२ वर्षानंतर दूर झाले नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी बिनवडे यांनीच आता लक्ष देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.