कोंबिंग आॅपरेशनदरम्यान मोठी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 01:18 AM2019-02-14T01:18:04+5:302019-02-14T01:18:22+5:30
जालना जिल्ह्यात मंगळवारी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या निर्देशानुसार शहरासह अन्य तालुक्यांमध्ये कोंबिंग आॅपरेशन राबविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्ह्यात मंगळवारी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या निर्देशानुसार शहरासह अन्य तालुक्यांमध्ये कोंबिंग आॅपरेशन राबविण्यात आले.
यामध्ये ६११ वाहनांची तपासणी करण्यात येऊन ३० वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून ६३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर बुधवारी देखील या अंतर्गत कारवाई करण्यात आली. यामध्ये हिटलिस्टवरील जवळपास ९१ गुन्हेगारांची तपासणी करण्यात येऊन १० जणांना वॉरंट बजावण्यात आले आहे. जुगार अड्ड््यांवरही छापा टाकण्यात येऊन एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एकूणच या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली असून, अशाच प्रकारची मोहीम नियमित सुरू राहणार आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्यासह त्या- त्या तालुक्यांचे पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी केली.