परतूर शहरात मोठा शस्त्रसाठा जप्त; पाच गावठी बंदूका, तीन तलवारी, कोयत्यांचा समावेश

By विजय मुंडे  | Published: September 14, 2024 07:54 PM2024-09-14T19:54:56+5:302024-09-14T19:55:11+5:30

पोलिसांच्या या कारवाईमुळे परतूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Large arms stock seized in Partur town; Including five village guns, three swords, koyotas | परतूर शहरात मोठा शस्त्रसाठा जप्त; पाच गावठी बंदूका, तीन तलवारी, कोयत्यांचा समावेश

परतूर शहरात मोठा शस्त्रसाठा जप्त; पाच गावठी बंदूका, तीन तलवारी, कोयत्यांचा समावेश

परतूर (जि. जालना) : परतूर पोलिसांनी शहरात केलेल्या कारवाईत पाच गावठी भरमार बंदूक, तीन धारदार तलवारी, कोयता, खंजीर, चाकू असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी दुपारी परतूर शहरातील शिकलकरी मोहल्ला भागात करण्यात आली असून, यावेळी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

करतारसिंग उत्तमसिंग पटवा, सोन्यासिंग प्रेमसिंग टाक (दोघे रा. साईनगर शिकलकरी मोहल्ला, परतूर) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. परतूर शहरातील शिकलकरी मोहल्ला भागातील इसमांकडे मोठा शस्त्रसाठा असल्याची माहिती परतूर पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी शनिवारी सकाळी शिकलकरी मोहल्ला भागात कारवाई केली. त्यावेळी करतारसिंग पटवा, सोन्यासिंग टाक यांच्याकडे पाच गावठी भरमार बंदूक, तीन धारदार तलवारी, एक कोयता, एक खंजीर, एक चाकू असा शस्त्रसाठा आढळला. तसेच दारूच्या नऊ बाटल्याही जप्त करण्यात आल्या आहेत. 

पोलिसांच्या या कारवाईमुळे परतूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलिस अधिकारी दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि एम.टी. सुरवसे, सपोनि जाधव, सहायक पोलिस निरीक्षक शिंदे, पोहेकॉ रामदास फुपाटे, गजानन राठोड, पोका विजय जाधव, गोविंद पवार, राम हाडे, नितीन बोंडारे, दीपक आढे, अच्युत चव्हाण, अंबादास दांडगे, भागवत खाडे, गोपानवाड, सुनील पवार, पवन धापसे, वाघ, गायकवाड, मपोकॉ कल्पना धडे, होमगार्ड गोपाल काकडे, कपिल आखाडे, जाधव यांच्या पथकाने केली.
 

Web Title: Large arms stock seized in Partur town; Including five village guns, three swords, koyotas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.