पशु प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 12:54 AM2019-02-01T00:54:20+5:302019-02-01T00:55:15+5:30
जालन्यात २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान अखिल भारतीय स्तरावरील भव्य पशु- पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पशुपालनाविषयी जनजागृती व्हावी आणि पशुपालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी जालन्यात २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान अखिल भारतीय स्तरावरील भव्य पशु- पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी घोडे, रेडा आणि अन्य पशु-पक्षी जालन्यात दाखल होण्यास प्रारंभ होत आहे.
या अंतर्गत राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी गुरूवारी प्रदर्शन स्थळाला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. यावेळी सिंधपंजाब येथील काठेवाडी या घोडे दाखल झाले आहेत. प्रदर्शनाचे आकर्षण असलेले सुल्तान , युवराज व कोहिनूर रेडे प्रदर्शनस्थळी दाखल झाल्याची माहिती राज्यमंत्री खोतकर यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी पांडुरंग डोंगरे, मनिष श्रीवास्तव, भरत गव्हाणे, आनंद भिसे, डॉ. सोनवणे, पशुसंवर्धन विभागाये सहाय्यक आयुक्त जगदीश बुकतरे, अमित दुबे, डॉ. दत्तात्रय झुंबड, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर, माहिती सहायक अमोल महाजन आदींची उपस्थिती होती.
यावेळी राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, या प्रदर्शनामध्ये आपल्या राज्यातील तसेच अन्य राज्यातील उत्तमोत्तम आणि जास्त दुध देणाऱ्या जातीच्या गायी व म्हशी तसेच शेती व ओढ कामासाठी अतिशय चांगली व उपयुक्त असलेले बैल, विविध जातींचे अश्व, वेगवेगळ्या जातींच्या वेगवेगळ्या राज्यातील शेळ्या व मेंढ्या, परस कुक्कुट पालन व व्यावसायिक कुक्कुट पालन यासाठी उपयुक्त असलेल्या वेगवेगळ्या जातींच्या कोंबड्या व्यावसायिक वराह पालनासाठी उपयुक्त असलेले विदेशी व संकरित जातींचे वराह देखील सहभागी होणार आहेत.