...अखेर गैरहजर कर्मचाऱ्यांचे खुलासे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:48 AM2018-03-15T00:48:28+5:302018-03-15T00:48:36+5:30
तहसील कार्यालयात बोलावण्यात आलेल्या महत्वाच्या बैठकीला वीस कर्मचारी गैरहजर राहिले. त्यानंतर सर्व कर्मचा-यांना नोटीसा बजावून चोवीस तासांत खुलासे करण्याचे तहसीलदारांनी बजावले होते. सोमवारी सर्वच गैरहजर कर्मचा-यांनी तहसीलदार बिपिन पाटील यांच्याकडे लेखी खुलासे सादर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : तहसील कार्यालयात बोलावण्यात आलेल्या महत्वाच्या बैठकीला वीस कर्मचारी गैरहजर राहिले. त्यानंतर सर्व कर्मचा-यांना नोटीसा बजावून चोवीस तासांत खुलासे करण्याचे तहसीलदारांनी बजावले होते. सोमवारी सर्वच गैरहजर कर्मचा-यांनी तहसीलदार बिपिन पाटील यांच्याकडे लेखी खुलासे सादर केले.
तालुक्यातील १४४ गावांचा भार तहसील कार्यालयावर आहे. कार्यालयतीन कामाच्या घाईगर्दीत अनेक महत्वाची कामे मागे राहत आहे. कामांचा प्राधान्यक्रम ठरवूनही विविध कामे प्रलंबित राहतात. जिल्ह्यात ११ फेबु्रवारी रोजी झालेल्या गारपिटीचा फटका जालना तालुक्यातील काही गावांना चांगलाच बसला आहे. कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले. यामुळे कर्मचा-यांना शेतक-यांना तातडीने मदत व्हावी यासाठी पंचनाम्याची काय स्थिती आहे. यावर तहसीलदार डॉ. बिपिन पाटील यांनी १० मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता तहसील कार्यालयातील बहुतांश कर्मचा-यांना सूचना देऊन हजर राहण्याचे बजावले होते. मात्र तब्बल वीस कर्मचा-यांना काहीच पूर्वकल्पना न देता कार्यालयात गैरहजर राहिले होते. यामुळे बैठकीत महत्वाच्या विषयावर चर्चा झाली नाही. तहसीलदारांनी आदेश देऊनही कर्मचारी गैरहजर राहिल्याबाबत लोकमतने ११ मार्च रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. याची गंभीर दखल घेत तहसीलदार पाटील यांनी वीस कर्मचा-यांना बैठकीला गैरहजर का राहिले याबाबात सविस्तर लेखी खुलासा करण्याचे बजावल्याने कर्मचारी हैराण झाले. काही कर्मचाºयांनी सोमवारी तर काहीनी मंगळवारी तहसीलदारांंकडे लेखी खुलासे दिले आहेत. यामुळे तहसीलदार पुढील कारवाई काय करणार याकडे लक्ष लागून आहे.