राजुरात ‘माझं गाव, सुंदर गाव’ अभियानाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:57 AM2021-02-05T07:57:29+5:302021-02-05T07:57:29+5:30
२२ जानेवारी ते २२ मार्चपर्यंत ‘माझं गाव, सुंदर गाव’ अभियान राबविण्यात येणार आहे. यामधे गावातील कचऱ्याची विल्हेवाट लावणे, शासकीय ...
२२ जानेवारी ते २२ मार्चपर्यंत ‘माझं गाव, सुंदर गाव’ अभियान राबविण्यात येणार आहे. यामधे गावातील कचऱ्याची विल्हेवाट लावणे, शासकीय कार्यालयाचे सुशोभीकरण, प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी, वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार करणे, गावात कायमस्वरूपी स्वच्छता मोहीम राबविणे, आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या उपक्रमाचा मंगळवारी राजुरेश्वर मंदिराच्या पायथ्यापासून स्वच्छता मोहीम हाती घेऊन शुभारंभ करण्यात आला. यावेळी विस्तार अधिकारी गजानन लहाने, सरपंच भाऊसाहेब भुजंग, ग्रामविकास अधिकारी जगन खैरे, विनोद डवले, रामेश्वर सोनवणे, तंटामुक्तीचे अध्यक्ष श्रीरामपंच पुंगळे, अप्पासाहेब पुंगळे, राहुल दरक, निवृत्ती पुंगळे, कृष्णा जाधव, संतोष मगरे, शिवाजी जगताप, विष्णू राज्यकर, बबन मगरे, दादाराव मगरे, अंकुश सोनवणे, भगवान सुद्रिक, गणेश पुंगळे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी ग्रामविकास अधिकारी जे.एम.खैरे यांनी गावातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत केरकचरा साफ केला जाणार असल्याचे सांगितले.
---------------------------
फोटो- राजूर येथे ‘माझं गाव, सुंदर गाव’ अभियानांतर्गत स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करताना सरपंच भाऊसाहेब भुजंग, ग्रामविकास अधिकारी जे.एम. खैरे आदी.