नेत्यांच्या सभांचे २० पथकांमार्फत होतेय चित्रीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 01:10 AM2019-10-17T01:10:57+5:302019-10-17T01:11:04+5:30

आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी २० पथकांमार्फत नेत्यांसह उमेदवारांच्या सभांचे व्हिडिओ चित्रीकरण केले जात आहे.

The leaders' meetings are filmed through 3 squads | नेत्यांच्या सभांचे २० पथकांमार्फत होतेय चित्रीकरण

नेत्यांच्या सभांचे २० पथकांमार्फत होतेय चित्रीकरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : विधानसभा निवडणुकीतील प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. प्रचाराच्या धामधुमीत आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी २० पथकांमार्फत नेत्यांसह उमेदवारांच्या सभांचे व्हिडिओ चित्रीकरण केले जात आहे. दुसरीकडे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक विभागाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मतदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी १९५० हा टोलफ्री क्रमांकही सुरू करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. आपल्याच पक्षाचा विजय व्हावा, यासाठी उमेदवारांसह राष्ट्रीय, राज्यस्तरावरील नेतेही प्रचाराच्या आखाड्यात उतरले आहेत. सभा, कॉर्नर बैठका, मतदारांच्या थेट भेटींसह सोशल मीडियावरही प्रचाराचा धुराळा उडविला जात आहे. या धामधुमीत आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी निवडणूक विभागाकडून २० व्हीएसटी पथकांमार्फत व्हिडिओ चित्रीकरण केले जात आहे. पथकांमार्फत होणाऱ्या व्हिडिओ चित्रीकरणाची तपासणी जिल्हाधिकारी कार्यालयातील पथक करीत आहे. याचा दैनंदिन अहवाल जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिला जात आहे. त्याशिवाय वाहनांची तपासणीही ठिकठिकाणी केली जात आहे.
मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे, व्हिडिओ चित्रीकरण, पोलीस बंदोबस्त, पाणी, स्वच्छतागृह, रॅम्प, लाईट, फर्निचर यासह इतर मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
वोटर स्लीप वाटपाचे काम ५० टक्के पूर्ण झाले असून, मतदान जागृती, मतदान कसे करावे, याबाबत निवडणूक विभागाकडून वोटर गाईड देण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबात एक वोटर गाईड देण्यात येणार आहे. मतदारांना कोणतीही अडचण आली तर ती सोडविण्यासाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. एकूणच जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक प्रमाणात मतदान व्हावे, यासाठी निवडणूक विभाग आवश्यक ती दक्षता घेत आहे.
सात ठिकाणी सखी केंदे्र
जिल्ह्यात सात मतदान केंद्र हे सखी मतदान केंद्र म्हणून राहणार आहेत. येथील संपूर्ण कामकाज महिला अधिकारी, कर्मचारी पाहणार आहेत. त्यांच्यासाठीही आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
३८ संवेदनशील मतदान केंद्रे
जिल्ह्यात ३८ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. त्यामुळे या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. शिवाय काटेकोर बंदोबस्तही या केंद्रांवर लावण्यात येणार आहे.


 

Web Title: The leaders' meetings are filmed through 3 squads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.