पान चाराचा पट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:27 AM2020-12-24T04:27:30+5:302020-12-24T04:27:30+5:30

वरूड : जाफराबाद तालुक्यातील वरूड बुद्रुक येथील ग्रामपंचायत निवडणुकीची चांगलीच धामधूम सुरू झाली असून, थंडीतही वातावरण चांगलेच ...

Leaf fodder belt | पान चाराचा पट्टा

पान चाराचा पट्टा

Next

वरूड : जाफराबाद तालुक्यातील वरूड बुद्रुक येथील ग्रामपंचायत निवडणुकीची चांगलीच धामधूम सुरू झाली असून, थंडीतही वातावरण चांगलेच तापले आहे. सरपंचपदाचे इच्छूक उमेदवार आतापासून पॅनल सेटिंगमध्ये गुंतले आहेत. २३ डिसेंबरपासून नामांकन पत्र दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. यादृष्टीने विविध पॅनल प्रमुख आपल्या पॅनलमध्ये कोणाला उमेदवारी द्यावी, याची चाचपणी करीत आहे.

जामखेड ते चिंचखेड रस्त्याची चाळणी

जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड ते चिंचखेड या रस्त्यावर अवजड वाहनांची रहदारी वाढल्यामुळे रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळणी झाली आहे. यामुळे दुचाकीस्वार वैतागून गेले आहेत. रस्ता दुरूस्तीसाठी संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी जामखेड परिसरातील ग्रामस्थांसह वाहनचालकांनी केली आहे.

शिवाजी विद्यालयात रक्तदान शिबिर

भोकरदन : भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही.पी. शेळके होते. या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. एस. एस. गोरे, प्रा. एच.व्ही. नागरगोजे, प्रा. आर.एस. मिसाळ, प्रा. बी.एस. पांडे, एम.एस. बरडे, एस.एम. तळेकर, एम.एम. ढाकणे आदींची उपस्थिती होती.

डॉ. एस.एस. शेख यांना पुरस्कार प्रदान

बदनापूर : शारीरिक शिक्षण व क्रीड विकास संशोधन तथा उत्तम कार्य करणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा व क्रीडा क्षेत्रात मानाचा समजला जाणारा आयएफपीईएफएसएसए लिडरशीप पुरस्कार बदनापूर येथील संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एस.एस. शेख यांना प्रदान करण्यात आला. ऑनलाईन झालेल्या कार्यक्रमात हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाचे अधिष्ठाता प्रा. एल. बी. लक्ष्मीकांत राठोडे, प्रा. डॉ. इनोबारथ्नम, हॅनरी डाऊट आदींची उपस्थिती होती. याबद्दल शेख यांचे कौतुक केले जात आहे.

चुर्मापुरी येथे चंपाषष्टी महोत्सव साजरा

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील चुर्मापुरी येथे चंपाषष्टीनिमित्त खंडोबा यात्रा भरवण्यात आली होती. खंडोबाच्या मंदिरात तळी भंडार उचलून गावातून मिरवणूक काढण्यात आली. येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष करण्यात आला. यात्रेचे आयोजन परंपरेनुसार गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून होत आहे. यादिवशी गावात मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. किर्तन भजन व जागरण असे कार्यक्रम घेण्यात आले. हभप वाघमारे यांचे कीर्तन झाले. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

संत गाडगेबाबा यांना अभिवादन

परतूर : येथील परीट समाजाच्या वतीने गंज शाळेच्या प्रांगणात संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी बाजार समितीचे सभापती कपिल आकात, अशोक आघाव, नगरसेवक कृष्णा आरगरडे, राजेश खंडेलवाल, शहराध्यक्षा राजेंद्र मुंदडा, माजी नगरसेवक विजय राखे, शामसुंदर चित्तोडा, सचिन खरात, संतोष चव्हाण आदींची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

परतूर : येथील कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने गरजंवत व गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी डॉ. संदीप चव्हाण, सुनील कासट, अजय देसाई, बाळासाहेब धुमाळ, जगदीश चांदर, सुनील चांदर, माऊली ढेरे, पंकज बिडवे, सौरव लाळे यांची उपस्थिती होती. संदीप चव्हाण म्हणाले की, समाजात वावरतांना आपणही या समाजाचे काही देणे लागते ही भावना जोपासावी, असेही ते म्हणाले.

रक्तदान शिबिरात २१ जणांचे रक्तदान

जालना : शहरातील राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. शिबिरात २१ जणांनी रक्तदान केले. याप्रसंगी डॉ. शोभा यशवंते, विजयमाला घुगे, डॉ. संतोष देशपांडे उपस्थित होते.

गणितदिन साजरा

अंबड : अंबड तालुक्यातील कर्जत येथील राजूरेश्वर विद्यालयात मंगळवारी राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव डॉ. राहूल डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी गणितीय संकल्पना विविध प्रयोगांतून सादर केल्या.

मीटर देण्याबाबत दिरंगाई

वालसावंगी : येथे विजेचा प्रश्न कायम ऐरणीवर आहे. त्यातच वीज मीटर देण्याबाबतही दिरंगाई होत आहे. ग्राहकांनी वीज मीटरसाठी संबंधितांकडे कागदपत्रे दिली होती, काहींनी कोटेशनसुध्दा भरले. मात्र, महिनाभराचा कालावधी होऊनही मीटर मिळालेले नाही.

विविध मागण्यांचे निवेदन

जालना : जालना- अंबड मार्गावरील गोलापांगरी येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सिमेंट रोड करण्यात यावा, अशी मागणी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनावर करण्यात आली. यावेळी ब्रम्हनंद चव्हाण आदी उपस्थित होते.

Web Title: Leaf fodder belt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.