बाळंतिणीला रस्त्यावरच सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:52 AM2017-11-30T00:52:48+5:302017-11-30T00:53:06+5:30

रूग्णाचा जीव वाचवण्यासाठी दिवसरात्र रूग्णवाहिका घेऊन धावणारे चालक आपण नेहमीच बघतो. पण एका रग्णवाहिका चालकाने नातेवाईकांसह घरी निघालेल्या ओल्या बाळंतिणीला गावापासून २० किमी दूर रस्त्यावरच उतरवून पोबारा केला.

Leave the babies on the road | बाळंतिणीला रस्त्यावरच सोडले

बाळंतिणीला रस्त्यावरच सोडले

googlenewsNext
ठळक मुद्देचालकाचा उद्दामपणा : ग्रामस्थांनी दिला मदतीचा हात

लोकमत न्यूज नेटवर्क
रांजणी : रूग्णाचा जीव वाचवण्यासाठी दिवसरात्र रूग्णवाहिका घेऊन धावणारे चालक आपण नेहमीच बघतो. पण एका रग्णवाहिका चालकाने नातेवाईकांसह घरी निघालेल्या ओल्या बाळंतिणीला गावापासून २० किमी दूर रस्त्यावरच उतरवून पोबारा केला. चालकाच्या उद्दामपणामुळे ओल्या बाळंतिणीला असह्य वेदना सोेसाव्या लागल्या. घनसावंगी तालुक्यातील रांजणी गावात आज ही संतापजनक घटना घडली. गावातील नागरिकांनी चौकशी केली असता हा प्रकार कळला. त्यानंतर पंचायत समिती सदस्यासह ग्रामस्थांनी वर्गणी करून खाजगी वाहनाद्वारे बाळंतिणीला घरी सोडले.
घनसावंगी तालुक्यातील जिरडगाव येथील अनिता संतोष पाईकराव यांची जालना शहरातील महिला व बाल रूग्णालयात मंगळवारी सकाळी प्रसुती झाली. त्यांना बुधवारी दुपारी चार वाजता सुटी देण्यात आली. त्यानंतर शासकीय रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून त्यांना घरी पाठविण्यात आले. मात्र, रूग्णवाहिकेच्या चालकाने मुजोरपणा करत बाळंतीण आणि नातेवाईकांशी वाद घातला. त्यानंतर या ओल्या बाळंतिणीला जिरडगावपासून २० कि़ मी. दूर अंतरावर असलेल्या रांजणी गावाजवळ रस्त्यावरच उतरवले. अनिता यांच्यासोबत दोन लहान मुली, सासू, सासरे आणि पती आणि एक तासाचे बाळ घेऊन हे कुटुंब रस्त्यावरच बसले होते. रस्त्यावर बसलेल्या पाईकराव कुटुंबियांची गावातील काही जणांनी चौकशी केली असता हा संतापजनक प्रकार समोर आला. याची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य शेख रहीम, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व गावातील नागरिक मदतीला धावून आले. ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करत त्यांना खाजगी वाहन करून दिले. मदत मिळल्याानंतर अनिता यांचे सासरे तात्यासाहेब यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

Web Title: Leave the babies on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.