पहिला सोडाच... दुसरा डोस घेणाऱ्यांच्या कोविशिल्डच्या लशीवर उड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:32 AM2021-04-23T04:32:39+5:302021-04-23T04:32:39+5:30
अनेक जण लसीकरणासाठी आले असताना त्यांना लस नसल्याने परत जावे लागले. तर दुसरा डोस घेणाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. ही ...
अनेक जण लसीकरणासाठी आले असताना त्यांना लस नसल्याने परत जावे लागले. तर दुसरा डोस घेणाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. ही लस घेतल्यावर कोरोना झाल्यावरही गंभीर त्रास होत नाही. या इंजेक्शनमुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे आता लसीकरणाला नागरिक स्वत:हून पुढे येत आहेत. लवकरच लसींचा आणखी साठा येणार असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता. संयम ठेवावा असे आवाहन जिल्हा समन्वयक डॉ. संतोष कडले यांनी केले आहे.
दोन्ही लसींचा तुटवडा कायम
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोन कंपन्यांचा जवळपास एक लाख ७२ हजार लशींचा साठा उपलब्ध झाला होता. तो पूर्णपणे संपला असून, गुरुवारी कोविशिल्डच्या केवळ १२०० लस प्राप्त झाल्या होत्या. त्या एका दिवसांत संपल्या आहेत. असे असले तरी लवकरच लशींचा मुबलक साठा येणार असून, नागरिकांनी चिंता करण्याचे कारण नसल्याचा खुलासा आरोग्य विभागाने केला आहे.