पतीला सोडून प्रियकरासोबत घरोबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:57 AM2018-06-10T00:57:10+5:302018-06-10T00:57:10+5:30
पतीला सोडून एका महिलेचा प्रियकरावर जीव जडला. दोघांनी एकमेकांसोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या. नातेवाइकांच्या उपस्थितीत तिने पतीला सोडून प्रियकरासोबत लग्न केले. शुक्रवार रात्री भोकरदन येथे हा प्रकार घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : पतीला सोडून एका महिलेचा प्रियकरावर जीव जडला. दोघांनी एकमेकांसोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या. नातेवाइकांच्या उपस्थितीत तिने पतीला सोडून प्रियकरासोबत लग्न केले. शुक्रवार रात्री भोकरदन येथे हा प्रकार घडला.
कुकडी येथील आशा हरिश्चंद्र बोराडे (२१) ही विवाहित तरुणी दोनदिवसांपासून घरातून निघून गेली होती. भोकरदन पोलीस ठाण्यात आईच्या तक्रारीवरून आशा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. शुक्रवारी रात्री आशा बोराडे ही प्रियकर सर्जेराव सुरेश दौड ( रा.पिंपळदरी ता. सिल्लोड) याच्यासह भोकरदन पोलीस ठाण्यात हजर झाली. याबाबत पोलिसांनी आशा यांच्या नातेवाइकांसह पोलीस पाटलांना कळलिवे.
त्यानंतर वाकडी गावचे पोलीस पाटील माधव शिरसाठ, दिलीप बर्डे, ईश्वर बोराडे यांच्यासह त्यांच्या नातेवाईक भोकरदन पोलीस ठाण्यात पोहोचले.
नातेवाइकांनी दोघांनाही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही लग्न करण्याचा निर्णयावर ठाम असल्यामुळे रात्री नातेवाईकांनी उपस्थितीत मारोती मंदिरात रात्री नऊच्या सुमारास पोलिसांच्या साक्षीने दोघांचा आहे त्या स्थितीत विवाह लावून दिला.
यावेळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, उपनिरीक्षक वैशाली पवार यांनी दोघांचे जबाब नोंदविले. आम्ही सज्ञान असून, स्वत:च्या मर्जीने गेलो होता व विवाह करणार असल्याचे त्यांनी जबाबात सांगितले. नातेवाइकांकडेही दोघांनी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.