बिबट्याचा वासरावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:24 AM2018-11-14T00:24:14+5:302018-11-14T00:24:28+5:30
घनसावंगी तालुक्यातील आरगडे गव्हाण शिवारात रविवारी रात्री बिबट्याने वासराचा फडसा पाडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील आरगडे गव्हाण शिवारात रविवारी रात्री बिबट्याने वासराचा फडसा पाडला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
आरगडे गव्हाण शिवारात शेषनारायण श्रीरंग गुजर यांच्या शेतातील आखाड्यावर दोन बैल, तीन गाय, दोन वासरे बांधलेली होती. परंतु, रविवारी रात्री आठ महिन्याच्या वासरावर बिबट्याने हल्ला केला. सोमवारी सकाळी गुजर हे शेतात आले असता, त्यांना वासरु मरण पावलेले दिसले. यानंतर त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करुन बोलवले. वनअधिकारी एस. एस. राठोड, शेख दाऊत यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
बिबट्याच्या दहशतीमुळे या भागातील शेती कामाला, कापूस वेचणी, पिकाना पाणी, ऊस तोडणी, गुरे सांभाळणे, खुरपणीसाठी मजूर मिळणे कठीण झाले. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहेत.